Dinvishesh
Dinvishesh Team Lokshahi
लोकशाही स्पेशल

आज काय घडले : कोहिनूर हिरा इंग्लंडच्या राणीकडे

Published by : Team Lokshahi

सुविचार

सत्य ही एक अशी शस्रक्रिया आहे की, ज्याने सुरुवातीला वेदना होतात, पण दुखण्यापासून कायमची मुक्ती मिळते.

आज काय घडले

  • १८५० मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या अध्यक्षांनी भारतातून आणलेला कोहिनूर हिरा इंग्लंडच्या राणीच्या स्वाधीन केला.

  • १८५२मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी दलितांच्या मुलांसाठी पहिली शाळा काढली.

  • १९९८ मध्ये ‘ऐ मेरे वतन के लोगों’ या देशभक्तीपर गीताचे रचनाकार कवी प्रदीप यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला.

आज यांचा जन्म

  • पत्रकार, प्रार्थना समाजाचे संस्थापकापैकी एक नारायण महादेव उर्फ मामा परमानंद यांचा १८३८ मध्ये जन्म झाला.

  • भारतीय स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेले कार्यकर्ते व मराठी कायदेतज्ज्ञ भाऊसाहेब तारकुंडे यांचा १९०९ मध्ये जन्म झाला.

  • इतिहासकार, नाटककार, कलादिग्दर्शक, वेशभूषाकार आणि नेपथ्यकार दत्तात्रय गणेश गोडसे यांचा १९१४ मध्ये जन्म झाला.

  • लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या सुनीता देशपांडे यांचा १९२६ मध्ये जन्म झाला. मराठी साहित्यिक पु. ल. देशपांडे त्यांचे पती होते.

  • भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग यांचा १९८० मध्ये जन्म झाला. आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाने त्यांच्या नेतृत्वाखाली विजेतेपद पटकविले.

आज यांची पुण्यतिथी

  • संत शिरोमणी नामदेव महाराज यांनी १३५० मध्ये समाधी घेतली. शिखांच्या गुरू ग्रंथसाहिबातले चरित्रकार, आत्मचरित्रकार आणि ‘कीर्तना’च्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते.

  • हिंदी चित्रपट अभिनेता कुलभूषण पंडित तथा राजकुमार यांचे १९९६ मध्ये निधन झाले.

  • परमवीर चक्र पुरस्काराने सन्मानित गोरखा रायफल्सचे भारतीय सैन्य अधिकारी कॅप्टन मनोज कुमार पांडे यांचे १९९९ मध्ये निधन झाले.

  • भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश योगेश कुमार सभरवाल यांचे २०१५ मध्ये निधन झाले.

"भाजप सरकारच्या नादानपणामुळे भारतीय सैनिकांवर हल्ला झाला"; 'मशाल' पेटवून उद्धव ठाकरेंचं PM मोदींवर शरसंधान

IPL 2024 : धरमशाला मैदानात चेन्नई बनला सुपर 'किंग'! पंजाबचा केला दारुण पराभव

"तुतारीची आता पिपाणी करायची आहे"; फलटणच्या सभेत उपमुख्यमंत्री फडणवीसांचा शरद पवारांवर हल्लाबोल

अलिबागच्या सभेत उद्धव ठाकरेंचा PM मोदींवर निशाणा, म्हणाले; "एकनाथ खडसेंचा मला फोन आला आणि..."

"छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला पण आज परिस्थिती बदलली"; शरद पवारांचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा