लोकशाही स्पेशल

गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्राचं दर्शन का घेऊ नये; जाणून घ्या काय आहे कथा...

Published by : Siddhi Naringrekar

कोरोनाच्या तब्बल दोन वर्षानंतर गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे. जिकडे तिकडे मोठ मोठ्या गणपतींचे मोठ्या थाटामाटात आगमन झाले आहे. मात्र यासर्व पार्श्वभूमीवर गणपती बाप्पाचं आगमन झाल्यानंतर म्हणजे गणेश चतुर्थीच्या रात्री चंद्रदर्शन करू नये असे म्हटले जात आहे. जाणून घ्या यामागचं नक्की कारण काय आहे हा प्रश्न सर्वांना पडलेला असतो. चला तर मग जाणून घेऊया काय आहे यामागचे कारण

गणेश चतुर्थीच्या रात्री चंद्रदर्शन करु नये यासंदर्भात एक कथा सांगितली जाते. एकेदिवशी लाडके बाप्पा मुषकावर सवार होऊन मोठ्या लगबगीने कुठे तरी जात होते. तेव्हा त्या गडबडीत असताना ते घसरले. दरम्यान त्यांना घसरताना पाहून चंद्र जोरजोरात हसू लागला. त्यामुळे गणपती बाप्पाला खूप राग आला आणि त्याने चंद्राला शाप दिला. बाप्पा म्हणाला, "आजपासून तुझं तोंड कोणी नाही पाहणार. जो तुझं तोंड पाहील त्याच्यावर चोरीचा खोटा आळ येईल". गणपती बाप्पाच्या या बोलण्याने चंद्र चांगलाच घाबरला. गणेशाला प्रसन्न करण्यासाठी त्याने मोठे तप केले. चंद्राच्या भक्तीने बाप्पादेखील प्रसन्न झाले आणि त्यांनी चंद्राला शापातून मुक्त केलं. पण तरीही गणेश चतुर्थीला तुझं तोंड कोणी पाहणार नाही. जो तुझं तोंड पाहील त्याच्यावर चोरीचा खोटा आळ येईल" ही अट कायम ठेवली.

त्यानंतर चंद्राने बाप्पाकडे विनंती केली की,"जर एखाद्याने चुकून त्या दिवशी चंद्राचे दर्शन केले तर त्याने काय करावे. माझ्या चुकीची शिक्षा एखाद्या निष्पाप व्यक्तीला नको". त्यावर बाप्पाने सांगितलं की,"संकष्ट चतुर्थी व्रत केल्यास खोट्या आळातून त्या व्यक्तिची सुटका होईल.

टीप : वरील सर्व बाबी लोकशाही न्यूज मराठी केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून लोकशाही न्यूज मराठी कोणताही दावा करत नाही.

Sanjay Raut: 'नाशिकमध्ये 800 कोटींचा भूसंपादन घोटाळा' राऊतांचा आरोप

रक्षा खडसे यांच्या प्रचारासाठी एकनाथ खडसे मैदानात

Nashik Crime: नाशिकमध्ये ICICI होम फायनान्समध्ये मोठी घरफोडी

Girgaon Linkedin Post Viral: गिरगावात जॉबसाठी आक्षेपार्ह जाहिरातीमुळे संताप; मराठी माणसालाच केली बंदी

आमदार रोहित पवार यांचा अजित पवार यांच्यावर हल्लाबोल; म्हणाले...