Rajmata Jijau Jayanti
Rajmata Jijau Jayanti Team Lokshahi
लोकशाही स्पेशल

आज राजमाता जिजाऊ यांची जयंती; जाणून घेऊया थोडक्यात जीवनप्रवास

Published by : shamal ghanekar

आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या माता राजमाता जिजाऊ यांची (12 जानेवारी रोजी) जयंती आहे. इंग्रजी कॅलेंडरनुसार, त्यांचा वाढदिवस १२ जानेवारीला असतो. तर मराठी दिनदर्शिकेनुसार पौष पौर्णिमेच्या दिवशी किंवा पौष महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. जिजामातांचे धैर्य, कर्तव्याची तीव्र भावना, स्वाभिमान यामुळे शिवाजी महाराजांना सर्वात महान मराठा शासक आणि योद्धा बनण्याची प्रेरणा मिळाली. राजमाता जिजाऊ या अहमदनगरच्या लखुजी जाधवरावांच्या कन्या होत्या. जिजाऊंच्या आईचे नाव म्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाई असे होते. जिजाऊंना दत्ताजी, अचलोजी, रघुजी आणि महादुजी असे चार भाऊ होते. राजमाता जिजाऊ यांचा विवाह पुण्याच्या शहाजीराजे यांच्याशी झाला होता.

शिवाजी महाराज हे पोटात असताना जिजाऊंना अनेक संकटांचा सामना करावा लागला होता. मराठा साम्राज्याच्या संस्थापक, राजमाता जिजाऊ यांनी शिवाजी महाराजांच्या संगोपनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. राजमाता जिजाऊ यांची जयंती महाराष्ट्रात थाटामाटात साजरी केली जाते. राजमाता जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला. जिजाऊंना लहानपणापासूनच अन्यायाविषयी द्वेष होता. त्यांनी अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी लहान वयातच तलवार आणि ढाल लढण्याचे कौशल्य आत्मसात केले होते.

डिसेंबर 1605 मध्ये त्यांचा विवाह शहाजी राजे भोसले यांच्याशी झाला. शहाजी राजे भोसले हे निजामशाहीचे सरदार होते. त्यानंतर 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊंनी शिवाजी महाराजांना जन्म दिला. राजमाता जिजाऊंना सहा मुली तर दोन मुले अशी एकूण आठ अपत्ये होती. जिजाऊंनी शिवबांना लहानपणीपासून रामायण, महाभारताच्या गोष्टी सांगितल्या. त्याचबरोबर जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी महाराज युद्ध कला शिकले. गरिब रयतेच्या सुखासाठी स्वतंत्र स्वराज्य बनवावे ही राजमाता जिजाऊंची इच्छा होती. त्यानंतर 23 जानेवारी 1664 साली शहाजी राजे भोसले यांचे निधन झाले. मात्र शहाजी राजे भोसले म्हणजे पतीच्या निधनानंतर जिजाऊंनी हार मानली नाही आणि त्या जीद्दीने पुन्हा उभ्या राहिल्या. स्वराज्य स्थापनेमध्ये जिजाऊंचे मोठे योगदान होते. आपल्या मुलाचा अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पाहण्याचं भाग्य त्यांना लाभलं नाही. 17 जून 1674 रोजी जिजाऊंची प्राणज्योत मावळली.

निवडणूक आयोगाला फटकारणाऱ्या उद्धव ठाकरेंना उपमुख्यमंत्री फडणवीसांचं चोख प्रत्युत्तर, ट्वीटरवर म्हणाले, "त्यांचा पराभव स्पष्टपणे..."

Daily Horoscope 21 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांच्या धन-संपत्तीत होणार बक्कळ वाढ; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 21 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

"मोदी पराभवाच्या भीतीमुळं निवडणूक आयोगाचा वापर घरगड्यासारखा करतात"; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

IPL 2024 Play Offs : प्ले ऑफचा सामना पावसामुळं रद्द झाल्यास पुढे काय होणार? जाणून घ्या सविस्तर माहिती