AMBERNATH NAGARPARISHAD ELECTION 2025 CASH DISTRIBUTION ALLEGATION 
महाराष्ट्र

Ambernath Nagarparishad Election 2025: अंबरनाथमध्ये मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप, दोन जणांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पकडलं

Bogus Voters in Ambernath : अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीदरम्यान प्रभाग क्रमांक २८ मध्ये मतदारांना पैसे वाटप केल्याचा आरोप झाला आहे.

Published by : Dhanshree Shintre

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

महाराष्ट्रातील २३ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसह विविध जिल्ह्यांतील एकूण १४३ सदस्यपदांसाठी आज (२० डिसेंबर) होणाऱ्या मतदान प्रक्रियेत खळबळ उडवणारी घटना घडली आहे. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होत असून, राज्यभरातील अनेक मतदान केंद्रांवर मतदारांनी सकाळपासून रांगा लावल्या आहेत. अशा वातावरणात अंबरनाथ नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २८ मध्ये पैशाचा पाठिंबा वाटप करताना दोन जणांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी रंगेहाथ पकडले.

अंबरनाथ शहरातील कोहोजगाव परिसरात ही घटना घडली. नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २८ मधील मतदान केंद्राजवळ दोन संशयित व्यक्ती पैशाची पॉकेट मतदारांना वाटप करत असल्याचे उघडकीस आले. हे पाहताच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ कारवाई करून या दोघांना पकडले आणि त्यांना भरारी पथकाच्या ताब्यात दिले. सध्या घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून, पुढील तपास आणि कारवाई सुरू आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या उमेदवाराकडून हे पैशाचे वाटप करण्यात आल्याचा थेट आरोप केला आहे. या प्रकरणाने निवडणूक मैदानात तणाव वाढला असून, मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. निवडणूक आयोगानेही याबाबत सतर्कता बावी ठेवली असून, पुढील माहितीची वाट पाहली जात आहे.

  • अंबरनाथच्या प्रभाग क्रमांक २८ मध्ये पैसे वाटपाचा आरोप

  • दोन संशयितांना कार्यकर्त्यांनी रंगेहाथ पकडले

  • भरारी पथक व पोलिसांकडून पुढील तपास सुरू

  • घटनेमुळे निवडणूक वातावरणात तणाव निर्माण

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा