BJP PADAYATRA IN BANDRA WEST | ASHISH SHELAR LEADS CAMPAIGN AHEAD OF BMC ELECTIONS 
महाराष्ट्र

Bandra West: वांद्रे येथे भाजपच्या वतीने पदयात्रेचे आयोजन, मंत्री आशिष शेलार यांची उपस्थिती

BJP Mumbai: मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने वांद्रे पश्चिमेत पदयात्रेचे आयोजन केले.

Published by : Dhanshree Shintre

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने प्रचाराचा जोरदार धडाका सुरू केला आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून वांद्रे पश्चिमेतील वॉर्ड क्रमांक १०१ मध्ये भाजपने पदयात्रेचे आयोजन केले.

या पदयात्रेत मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी हजेरी लावली आणि भाजपच्या उमेदवार अनुश्री गजेंद्र घोडके यांना पाठिंबा जाहीर केला. मेहबूब स्टुडिओसमोरून सुरू झालेल्या या पदयात्रेत भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक सहभागी झाले होते.

उत्साही वातावरणात पार पडलेल्या या पदयात्रेमुळे वांद्रे परिसरात भाजपच्या प्रचाराला जोरदार गती मिळाली आहे. महापालिका निवडणुकीसाठी भाजप पूर्ण ताकदीने मैदानात उतरल्याचे या कार्यक्रमातून स्पष्ट झाले.

• वांद्रे पश्चिमेतील वॉर्ड १०१ मध्ये भाजपची पदयात्रा
• मंत्री आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती
• भाजप उमेदवार अनुश्री घोडके यांना जाहीर पाठिंबा
• महापालिका निवडणूक प्रचाराला वेग

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा