महाराष्ट्र

Bachchu Kadu | मविआ सरकार कोसळताच बच्चू कडूंना रस्ते घोटाळ्यात क्लीन चिट

Published by : Shweta Chavan-Zagade

उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आहे. एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या अनेक आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे सरकार अल्पमतात आलं होतं. या बंडखोर आमदारांमध्ये बच्चू कडू यांचाही सहभाग आहे. दरम्यान, बच्चू कडू (Bachchu Kadu) यांना एका गैरव्यवहार प्रकरणी अकोल्यात क्लीन चिट देण्यात आली आहे. बच्चू कडूंना तीन रस्त्यांच्या कामात गैरव्यवहार केला असल्याचं वंचित बहुजन आघाडीने उघडकीस आणलं होतं. या प्रकरणातून क्लीन चीट मिळाली आहे.

अस्तित्वात नसलेल्या तीन रस्त्यांच्या कामात तब्बल एक कोटी 95 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप त्यांच्यावर होता. हे प्रकरण कोर्टात दाखल होतं. सिटी कोतवाली पोलिसांत बच्चू कडूंवर फसवणूकीचे गुन्हे दाखल झालेले होते. संपुर्ण प्रकरणात पुरावे नसल्यानं प्रकरणच तथ्यहिन असल्याचं पोलिसांकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. या प्रकरणाची फाईल पोलिसांनी बंद केली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

अकोल्यातील जिल्हा परिषदेकडून जिल्हा नियोजन समितीकडे पाठविलेल्या रस्त्यांच्या प्रस्तावामध्ये परस्पर बदल करून पालकमंत्री बच्चू कडूंनी कोटी ९५ लाखांचा निधीचा अपहार केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला होता. दरम्यान, जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी जिल्हा नियोजन समितीच्या १३ कामांना स्थगिती दिल्याने पालकमंत्री कडू यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याची मागणी वंचितने केली आहे.

यासंदर्भात प्रकाश आंबेडकरांनी ७ फेब्रुवारीला कारवाईच्या परवानगीच्या मागणीसाठी राज्यपालांची भेट घेतली होती. राज्यपालांच्या पत्रात यासंदर्भात योग्य ती कारवाई करण्याचे आदेश अकोला जिल्हा पोलिस अधीक्षकांना देण्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडीनं बच्चू कडू यांच्यावर त्वरित गुन्हे दाखल करण्याची मागणी पोलिसांकडे केली.

सोबतचं प्रथमश्रेणी न्यायालयाने कलम १५६ (३) नुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश बजावले. वंचित बहुजन आघाडीने यासंदर्भात न्यायालयात अर्जही केला होता. हा अर्ज न्यायालयाने मंजूर करून थेट सिटी कोतवाली पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसासर कडूंवर फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले होते.

कुठल्या कामात अपहार झाल्याचा आरोप

१) गायगाव ते रिधोरा रस्त्याला जोडणारा लहान पुल आणि पोचमार्गाच्या कामात ५० लाखांच्या अपहाराचा आरोप
२) इतर जिल्हा मार्गाला (इजिमा) जोडणाऱ्या धामना ते नवीन धामना जोड रस्ता सुधारणेच्या कामात २० लाखांच्या अपहाराचा आरोप
३) कुटासा ते पिंपळोद मार्गाला जिल्हा मार्ग मार्ग दाखवत यासाठी निधी वळता करीत १ कोटी २५ लाखांच्या अपहाराचा आरोप

"परळी तालुक्यात अधिकाऱ्यांना धमकावून बोगस मतदान "; ट्वीटरवर व्हिडीओ शेअर करत आमदार रोहित पवारांनी केले गंभीर आरोप

IPL 2024 : अभिषेक-क्लासेनचा झंझावात! वादळी खेळी करून पंजाब किंग्जचा उडवला धुव्वा, हैदराबादचा दमदार विजय

"पाकिस्तानचा झेंडा घेऊन मिरवणाऱ्या उबाठाच्या उमेदवारांवर कारवाई करा"; किरण पावसकरांचा ठाकरेंवर हल्लाबोल

IPL 2024 : आरसीबीने CSK विरोधात रचला इतिहास; टी-२० क्रिकेटमध्ये 'हा' कारनामा करणारा ठरला पहिला संघ

"लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांमध्ये महाविकास आघाडीनेच बाजी मारलीय"; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा मोठा दावा