राज्यात सध्या अभूतपूर्व राजकीय गोंधळ सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विवध विषयावरून जोरदार टीकाटिपणी सुरु असताना काल निवडणूक आयोगाने शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांना नवे नाव दिले आहे. ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह मिळाले तर शिंदे गटाच्या चिन्हावर आज निर्णय येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर अनेक राजकीय मंडळीकडून याबाबत प्रतिक्रिया येत आहे. त्यावरच बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे.
माध्यमांशी बोलताना नारायण राणे म्हणाले की, "तुम्हाला तर क्रांती घडवायची होती तर सत्तेत असताना आणि मुख्यमंत्री असताना क्रांती घडवली नाही. लोकांचं घर उद्ध्वस्त करायला मशाल लावली. तुमच्या नावात उद्धव आहे, पण उद्ध्वस्त करायला मिशाल लावू नये. आता राज्यात एवढा उजेड पडला आहे की मशालची गरजच पडणार नाही. याआधीही धनुष्यबाण काही उजेड पाडू शकला नाही, मग आता मशाल काय उजेड पाडणार", अश्या जहरी शब्दात नारायण राणे यांनी ठाकरेंवर टीका केली आहे.
पुढे ते म्हणाले की, "मशाल काळोखातून रस्ता काढायला लागते. मग यांना काय दिसत नाही काय? एवढा उजेड आहे तर कशाला मशालची गरज आहे. लोकांना घर, अन्नधान्य आणि पोटाचा प्रश्न हे खरे प्रश्न आहेत", अस बोलत नारायण राणे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
महाराष्ट्र सरकारने तपास हस्तांतरणाला आपली हरकत नसल्याचे सांगितले असून तसे शपथपत्रही सर्वोच्च न्यायालयात सादर केले आले. राज्य सरकारच्या निर्णयावर बोलताना राणे म्हणाले की, पालघर साधू हत्येची चौकशी होईल, सत्य बाहेर येईल, कायदा सुव्यवस्था चांगली होईल, साधू संत, महिलांचे रक्षण होईल. अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.