राजकारण

बावनकुळे वेस्ट इंडीजच्या खेळाडूसारखे दिसतात; जाधवांच्या टीकेला चित्रा वाघांचे प्रत्युत्तर, अरे भास्कर, आता बस कर..!

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंवर टीकेचा जाधवांवर चित्रा वाघ यांनी घेतला समाचार

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : चंद्रशेखर बावनकुळे हे आहेत महाराष्ट्राचे, मात्र दिसतात वेस्ट इंडीजच्या खेळाडूसारखे, असे विधान ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी केले आहे. यावर भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी भास्कर जाधवांना प्रत्युत्तर दिले आहे. अरे भास्कर... आता बस कर.., असे म्हणत फक्त बावनकुळे यांचा नाही, तर समस्त कृष्णवर्णीयांचा जाधवांकडून अपमान केला असून त्यांनी माफी मागावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.

काय म्हणाले होते भास्कर जाधव?

चंद्रशेखर बावनकुळे हे आहेत महाराष्ट्राचे, मात्र दिसतात वेस्ट इंडीजच्या खेळाडूसारखे. तर नेमका कोणता? विवियन रिचर्ड मजबूत होता, चंद्रशेखर बावनकुळे पॅट्रिक पॅटरसनसारखा दिसतो का? तर नाही, ब्रायन लारासारखो दिसतो का? नाही मग तो कोणासारखो दिसतो तर वेस्ट इंडीजचा खेळाडू अ‍ॅम्ब्रोससारखा तो दिसतो, हे लक्षात आले. जुन्या लोकांना माहित आहे अ‍ॅम्ब्रोस कसे होते. नाहीतर बावनकुळे त्यांना रागवायचे, अशी टीका भास्कर जाधवांनी केली होती.

चित्रा वाघ यांचे प्रत्युत्तर

कोण विचारत नाही म्हणून एवढ्या खालच्या दर्जाचं विधान करून लोकांचं लक्ष वेधून घेण्याची तुमची ही तऱ्हा आम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे. पण, किती खाली पडायचं याला पण काहीतरी लिमिट असू द्या! तुमच्यासारख्या लोकांनी राजकारणाचा चिखल केलाय. बावनकुळे यांच्या कामाबद्दल बोलायची तुमच्यात हिंमत नाही तर आता त्यांच्या वर्णावरून बोलायला लागलात. असे करून तुम्ही फक्त बावनकुळे यांचा अपमान करत नाही आहात तर समस्त कृष्णवर्णीयांचा अपमान करत आहेत.

असो, तुमच्यासारख्या अकार्यक्षम आणि निर्बुद्ध लोकांकडून दुसरी काय अपेक्षा? राजकारणात तुम्ही आलातच आहात स्वतःचे खिसे भरून लोकांना नाव ठेवायला! स्वतःच्या शब्दांची जरा जरी लाज असेल तर ताबडतोब माफी मागा! बाकी...देव तुमच्यासारख्यांना सद्बुद्धी देवो हीच प्रार्थना, असे चित्रा वाघ यांनी ट्विटरवर म्हंटले आहे. सोबतच, ब्रेनलेस भास्कर असा हॅशटॅगही दिला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Tesla in India : टेस्लाची भारतात धडाक्यात एंट्री; मुंबईत पहिले शोरूम सुरू, 'मॉडेल Y' उपलब्ध

Dheeraj Kumar Passed Away : अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक धीरज कुमार यांचे निधन ; 79वर्षी घेतला अखेरचा श्वास

MSRTC Ganeshotsav Gift : मुंबईतील कोकणी चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाचे गणेशोत्सव गिफ्ट

Mumbai Stock Exchange Bomb Threat : मुंबई स्टॉक एक्सचेंज इमारत बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क