ED summons to Rahul Gandhi|Renuka Chowdhury  team lokshahi
राजकारण

काँग्रेस नेत्याची मगरुरी; पोलिसाची धरली कॉलर, व्हिडिओ व्हायरल

आंदोलकांची पंतप्रधान मोदी आणि पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी

Published by : Shubham Tate

Renuka Chowdhury : हा व्हिडिओ आहे काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांचा, ज्यांनी राहुल गांधींना ईडीने बोलावलेल्या समन्सवर हैदराबादमध्ये आंदोलन केले. यादरम्यान पोलिसांनी काँग्रेस नेत्या रेणुका यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली असता रेणुका चौधरी यांनी एका पोलिसाची कॉलर पकडली. त्याला त्याची कॉलर रेणुका चौधरी यांच्या तावडीतुन सोडवता आली नाही. (congress leader renuka chowdhury holds a policemans collar during protest in hyderabad over ed summons to rahul gandhi)

नॅशनल हेराल्ड-एजेएल डीलशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात पक्षाचे सर्वोच्च नेते राहुल गांधी यांच्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) चौकशीच्या विरोधात गुरुवारी मोठ्या संख्येने काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी राजभवनाजवळ निदर्शने केली.

काँग्रेसच्या तेलंगणा युनिटने "चलो राजभवन" च्या आवाहनाचा एक भाग म्हणून राजभवनाला घेराव घालण्याचा आंदोलकांचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. लोकांना राजभवनाकडे जाण्यापासून रोखण्यासाठी तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटी (TPCC) अध्यक्ष आणि पक्षाचे खासदार ए रेवंत रेड्डी, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते मल्लू भट्टी विक्रमार्का आणि इतर अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

आंदोलनामुळे खैरताबाद चौक व परिसरात वाहतुकीची कोंडी झाली होती. आंदोलनादरम्यान एक दुचाकी जाळण्यात आली. याशिवाय काही आंदोलक सरकारी बसमध्ये चढताना दिसले. एका आंदोलकाने बसच्या खिडकीच्या काचा फोडल्या. आंदोलकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sanjay Rauat : "हे सरकार म्हणजे हवा भरलेले फुगे"; विजयी मेळाव्यानंतर राऊतांची पहिली प्रतिक्रिया

Uddhav Thackeray on Devendra Fadanvis : आंतरपाट दूर करणारे अनाजी पंत म्हणत उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर थेट निशाणा

Sanjay Shirsat On Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "पडझड ही उबाठा गटाची झाली, राज ठाकरेंची नाही"

Raj Thackeray On Devendra Fadnavis : "माझे वडील आणि काका इंग्रजीत शिकले पण..." फडणवीसांच्या टीकेला राज ठाकरेंकडून सडेतोड उत्तर