Devendra Fadnavis Eknath Shinde Team Lokshahi
राजकारण

राज्यपालांची भेट घेऊन भाजपची फ्लोर टेस्टची मागणी, शिंदे गटही सोडणार गुवाहाटी

अपक्ष आमदारांचाही पाठिंबा शिंदे गटाला

Published by : Shubham Tate

eknath shinde governor floor test : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर एकीकडे एकनाथ शिंदे गटाने आनंद व्यक्त केला आहे तर दुसरीकडे भाजपही (BJP) सक्रिय झाला आहे. निकालानंतर शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा विजय झाल्याचे ट्विट केले. त्याचवेळी भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. शिंदे गटाच्या आमदारांना मोठा दिलासा देत सर्वोच्च न्यायालयाने 12 जुलैपर्यंत अपात्रतेपासून दिलासा दिला आहे. न्यायालयाने फ्लोर टेस्टला स्थगिती दिलेली नाही. अशा स्थितीत राज्यपालांची भेट घेऊन भाजप फ्लोअर टेस्टची मागणी करू शकते, असे मानले जात आहे. दुसरीकडे शिंदे गटही लवकरच गुवाहाटी सोडून येऊ शकतो. (eknath shinde fraction may leave guwahati bjp can ask governor for floor test)

उद्धव ठाकरेंसोबतची संख्या सातत्याने कमी होत आहे. बहुतांश मंत्री शिंदे गटात गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांच्या कामाचे फेरवाटप केले आहे. एकनाथ शिंदे यांच्या गोटात 40 हून अधिक आमदार असल्याचे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. अशा परिस्थितीत बहुमत सिद्ध करण्यासाठी 144 आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. सध्याच्या सरकारमध्ये शिवसेनेचे 55, राष्ट्रवादीचे 53 आणि काँग्रेसचे 44 आमदार आहेत. याशिवाय अपक्ष आमदारांचाही पाठिंबा विद्यमान सरकारला मिळाला होता.

काय आहेत भाजपची समीकरणे

भाजपने राज्यपालांकडे फ्लोअर टेस्टची मागणी केली आणि परवानगी घेतली, तर पक्ष सध्या मजबूत स्थितीत आहे. भाजपकडे सध्या 106 आमदार आहेत. अशा परिस्थितीत हा पक्ष आजही प्रमुख विरोधी पक्ष आहे. शिंदे गटाने भाजपशी हातमिळवणी केली तर ते विधानसभेत सहज बहुमत सिद्ध करून सरकार स्थापन करेल.

सध्याच्या परिस्थितीबद्दल बोलायचे झाले तर राष्ट्रवादीचे 53, शिवसेनेचे 17 आणि काँग्रेसचे 44 आमदार सरकारसोबत आहेत. सरकारच्या विरोधात संख्या अधिक दिसून येत आहे. अपक्ष आमदारांचाही समावेश झाल्यास भाजपचे 106, शिंदे 38 आणि अन्य 20 आमदारांसह ही संख्या 164 होईल.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींच्या कामांना यश मिळण्याची शक्यता , कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली