Eknath Shinde Ajit Pawar team lokshahi
राजकारण

एकनाथ शिंदेंनी केलं अजित पवारांचं कौतूक

माझ्या खात्यात सगळे हस्तक्षेप करायचे, माझ्यापेक्षा वरीष्ठ असल्यानं मी बोलू शकत नव्हतो; एकनाथ शिंदे

Published by : Shubham Tate

Eknath Shinde Ajit Pawar : विधान परिषद निवडणुकीच्या दरम्यान अपमानास्पद वागणूक मिळाली. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी आम्हाला अन्यायाविरोधात उभं राहण्याची शिकवण दिली. विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर बाहेर पडलो. लढून शहीद झालो तरी चालेल पण माघार नाही. शिवसेना (Shiv Sena) वाचवण्यासाठी प्रयत्न करणार हे त्याच दिवशी ठरवलं असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. विधानसभेत विश्वासमत दर्शक ठराव जिंकल्यानंतर अभिनंदन प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी वक्तव्य केले आहे. (Eknath Shinde praised Ajit Pawar)

पन्नास लोकांच्या मतदारसंघातली कामं झाली नाहीत. अजित पवार माझ्या विभागाचा निधी घ्यायचे. आठशे कोटी घेतले तरी मी काय बोललो नाही. नंतर तुम्ही पॅरालल नगरविकास विभागाचा हेड का केलं. मला काम करणारी माणसं आवडतात. मी कदीही खोडा घातला नाही. माझ्या विभागात सर्वच हस्तक्षेप करत होते. तसेच एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं की, अजित दादांची अन् माझी अंडरस्टॅंडींग होतं. त्यांनी माझ्या मंत्रालयाच्या सुद्धा बैठका घेतल्या, मी त्यांना कधी बोललो नाही. कारण तो माणूस काम करत होता असं म्हणत एकनाथ शिंदेंनी अजित पवारांचं कौतूक केलं. माझ्या खात्यात सगळे हस्तक्षेप करायचे, माझ्यापेक्षा वरीष्ठ असल्यानं मी बोलू शकत नव्हतो असं एकनाथ शिंदे म्हणाले.

काही लोकं आमचा बळी देण्यापासून ते काहीही बोलत होते. आता देवीने कुणाचा बळी घेतला. चाळीस रेडे पाठवल, देवी बोलली जो बोललाय तो रेडा आम्हाला नको. सहन करण्याची एक परिसीमा असते. कुणी वैयक्तिक घेण्याची गरज नाही. शिवसेनाप्रमुखांचा मतदानाचा अधिकार का काढला होता. तक्रार काँग्रेसने केली होती. अशा हिंदुत्वाला नेहमी विरोध करणाऱ्या पक्षासोबत कसं बसायचं. भुजबळ साहेब इकडे आहेत त्यांना माहिती आहे. बाळासाहेबांनी मुंबईत वाचवली दगंलीत.

मी दोन तीन वेळा माझ्या पदाचा राजीनामा दिला होता. फडणवीस बोलले चिंता करू नका. तेव्हा त्यांनी मला समृद्धी महामार्गाचं काम दिलं गेलं. जे खातं बुडीत झालं त्याला ताकद दिली. तो मार्ग आज पूर्णत्वास जात आहे. फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. हा तुम्हाला करायचा आहे. मी रिस्क घेऊन जायचं. एकदा तर आमचं विमान क्रॅश होणार होतं. आमचा कार्यक्रम आटोपणार होता.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा