Sanjay Raut | Girish mahajan Team Lokshahi
राजकारण

'मोतीबिंदूसारखा राऊतांच्या डोळ्यांवर हिंदुत्व विरोधी बिंदू, ऑपरेशन करावं लागेल'

संजय राऊतांच्या टीकेला गिरीश महाजानांचे सडेतोड उत्तर

Published by : Shweta Shigvan-Kavankar

जळगाव : हिंदु जनआक्रोश मोर्चावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले होते. खरंतर भाजपमध्ये मोदी शहा फडणवीस यांच्यासारखे कडवट नेते असताना लव्ह जिहाद होत असेल तर हे सरकारचं अपयश आहे, अशी टीका राऊतांनी केली होती. यावर भाजप नेते गिरीश महाजन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत यांच्या डोळ्यांचे ऑपरेशन करावं लागेल, असा मिश्कील टोला त्यांनी राऊतांना लगावला आहे.

संजय राऊत यांच्या डोळ्यांचे ऑपरेशन करावं लागेल. संजय राऊत यांच्या डोळ्यांवर मोतीबिंदूसारखा कोणता तरी बिंदू आल्याने त्यांना हिंदुत्व विरोधी दिसत आहे. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्या सेनेने हिंदुत्वाची फारकत घेतली आहे. त्यांना आता हिंदुत्व या शब्दाची ॲलर्जी झाली आहे. नैराश्यातून ते अशाप्रकारे वक्तव्य करत आहेत, अशी टीका गिरीश महाजन यांनी केली आहे.

काय म्हणाले होते?

ती भाजपचीच रॅली होती. तो काही हिंदू जनआक्रोश वगैरे नव्हता. लोकांचा असा गैरसमज आहे की तो मोदींच्या विरोधातील आक्रोश होता. मोर्चाचं नेतृत्व भाजपचे लोकच करत होते. फक्त कपडे बदलले होते. लोक तीच होती. मोर्चा काढून भाजपने मोठी चूक केली. खरंतर भाजपमध्ये मोदी शहा फडणवीस यांच्या सारखे कडवट नेते असताना लव्ह जिहाद होत असेल तर हे योग्य नाही. हे सरकारचं अपयश आहे. त्यामुळे ते बहुधा न्याय मागण्यासाठी ते बाळासाहेब ठाकरेंसमोर आले असावे, असा निशाणा संजय राऊत यांनी साधला होता.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना धनलाभ होण्याची शक्यता, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

PM Narendra Modi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक सन्मानित व्यक्ती

Malnourished Children : राज्यात कुपोषित बालकांचा आकडा धडकी भरवणारा ; महिला आणि बालविकास मंत्र्यांची माहिती

Deepika Padukone : दीपिका पदुकोण हॉलिवूडमध्ये इतिहास रचणार! 'Walk of Fame'वर स्थान मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री