राजकारण

लवकरात लवकर ही केवळ राजकीय व्यासपीठावरील भाषा; झिरवाळांचा नार्वेकरांना टोला

16 आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणी नरहरी झिरवाळ यांनी राहुल नार्वेकरांना टोला लगावला आहे

Published by : Shweta Shigvan-Kavankar

महेश महाले | नाशिक : 16 आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही शिवसेनेची घटना तपासणी करणार असल्याचे वक्तव्य केले. यावर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी नार्वेकरांना टोला लगावला आहे. लवकरात लवकर निर्णय घेणे ही केवळ राजकीय व्यासपीठावरील सभागृहाची भाषा असते. निर्णय हा काही लवकर लागतच नाही, असा खोचक टोला झिरवाळ यांनी नार्वेकर यांना लगावला.

नरहरी झिरवाळ म्हणाले की, आता तपासणी पलीकडे मार्ग नाही. किती दिवस तपास केला तरी तो ठरलेलाच आहे. सर्वोच्च न्यायालयाने दहा-बारा बाबी सांगितल्या. त्या सगळ्याच विरुद्ध आहे. फक्त एकच बाब आहे, ती त्यांना तपासायला दिली आहे. पण, तपास हा तपासच असतो. तो कधीपर्यंत चालेल याची खात्री नाही, असे त्यांनी म्हंटले आहे.

लवकरात लवकर ही केवळ राजकीय व्यासपीठावरील सभागृहाची भाषा आहे. आजही लवकर आणि सहा महिने झाले तरी लवकरच, असा निशाणाही झिरवाळ यांनी नार्वेकरांवर साधला आहे.

वास्तविक फार त्यात तपास करण्यासारखे काहीच नाही. तपास हा सर्वोच्च न्यायालयाने करूनच आपल्याकडे दिला आहे. तरी त्यांना खात्री करण्याचा अधिकार आहे ते करतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. तर, शिवसेना प्रतोद बदलण्याच्या हालचाली सुरु असल्याची बातमी समजत आहे. याबाबत बोलताना नरहरी झिरवळ यांनी शिवसेनेला प्रतोद बदलणे इतकं सोपं नसल्याचे म्हंटले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sahitya Sangh Mandir : गिरगावचे साहित्य संघ राजकारणाच्या भोवऱ्यात?

Latest Marathi News Update live : मुंबईसह ठाण्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज…

Weather News : मुंबईत काळ्या ढगांची गर्दी; पुढील तासांत मुसळधार पावसाची शक्यता

Credit Score : क्रेडिट स्कोअर कसा वाढवायचा, नेमकी प्रक्रिया कशी जाणून घ्या...