(Maharashtra Weather Update ) गेल्या काही दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. राज्यात पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाने विविध जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा दिला आहे.
यातच आज महाराष्ट्रातील अनेक भागांत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून मुंबई, ठाणे, पालघर येथे हलक्या ते मध्यम सरी यासोबतच काही भागांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सांगली, कोल्हापूरमध्ये नद्या-नाल्यांना पुराचा धोका सांगितला असून रत्नागिरी व सिंधुदुर्गमध्ये देखील जोरदार सरी कोसळणार आहेत. पुणे व सातारा घाटमाथा परिसरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक भागांत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.