महाराष्ट्र

आपल्या मुलाकडे द्या लक्ष! कारण ही बातमी वाचून व्हाल धक्क

Published by : shweta walge

अंबरनाथ मधील सिद्धार्थ नगरमध्ये एका अल्पवयीन मुलाने दुसऱ्या अल्पवयीन मुलाच्या अंगावर पेट्रोल टाकून आग लावल्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथमध्ये घडला आहे. त्यामध्ये अकरा वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी शासकीय छाया उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अंबरनाथ मधील सिद्धार्थ नगरमध्ये जखमी अकरा वर्षीय मुलगा हा आपल्या वयाच्या मित्रांसोबत खेळत होता आणि खेळ खेळामध्ये त्याच्या एका मित्राने त्याच्या वर पेट्रोल टाकले आणि दुसऱ्याने त्याच्या अंगाला माचिसची काडी पेटवून लावली, यावेळी जखमी मुलाने आग विझवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला मात्र त्याला आग काही विझवायला जमले नाही आणि आग विझवायला तो घरी आला, तेव्हा त्याच्या पालकांनी त्याचा जळत असलेल्या शर्टावर पाणी टाकून ती आग विझविली, या घटनेत मुलगा गंभीररित्या भाजला असून, त्याच्यावर छाया रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान अंबरनाथ मधील हा प्रकार अत्यंत गंभीर असून पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवण्याची आवश्यकता असल्याचे दिसून येत आहे. आपली मुलं बाहेर काय करतात, तसेच या अल्पवयीन मुलांकडे पेट्रोल आले कुठून असे प्रश्न आता उपस्थित होत आहे. या जखमी मुलावर शनिवारी दुपारी चार वाजल्यापासून छाया रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र कोणतीही तक्रार स्थानिक पोलीस ठाण्यात दाखल झालेले नसून रुग्णालयाने रात्री दोन वाजेपर्यंत स्थानिक पोलीस स्टेशनला माहिती न दिल्याने कोणतीही तक्रार दाखल झालेली नव्हती, रुग्णालयाने इतका गंभीर प्रकार कसा नाही पोलिसांना कळविला याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत, दोषींवर कारवाई करण्यासाठी CM शिंदेंनी दिल्या सूचना

T20 वर्ल्डकपनंतर रोहित शर्मा घेणार निवृत्ती? हार्दिक पंड्याच्या निवडीबाबत मोठी अपडेट आली समोर

दिनविशेष 14 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

मुंबई, ठाणे, रायगडला अवकाळी पावसानं झोडपलं! वादळी वाऱ्यामुळं घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळलं, ४ जणांचा मृत्यू

"राहुल गांधी तुम्ही पाकिस्तानला घाबरा पण आम्ही भाजपवाले आहोत", पालघरमध्ये अमित शहांचा इंडिया आघाडीवर घणाघात