महाराष्ट्र

लोकल प्रवासावर पुन्हा निर्बंध येणार?; आरोग्य मंत्र्यांचे संकेत

Published by : Lokshahi News

राज्यात कोरोनाचा वाढता आलेख पाहता मुंबईची लाईफलाईन समजली जाणाऱ्या लोकलवर पुन्हा एकदा निर्बंध येण्याची शक्यता आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी हा इशारा दिला आहे. त्यामुळे मुंबई आणि उपनगरातील प्रवाशांच्या चिंतेत भर पडणार असून प्रवासास मुकावे लागण्याची शक्यता आहे.

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. सर्वसामान्य नागरिकांनी नियम पाळले पाहिजे. मास्क, सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं पाहिजे. पण लोकांनी नियम पाळले नाहीत तर लोकलबाबत काही कठोर निर्णय घ्यावे लागतील", असं राजेश टोपे म्हणाले

दरम्यान अद्याप तर लोकल ट्रेनवर निर्बंध आणण्यात आले नाही आहेत. मात्र जर असाच रुग्णसंख्येचा आकडा वाढत राहीला तर प्रशासन लोकल ट्रेनवर निर्बंध आणण्याची शक्यता आहे.

Labour Day Wishes: ज्यांच्या कठोर परिश्रमामुळे आणि समर्पणामुळे देश घडला अशा सर्व कामगारांना, कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Marathi Rajbhasha Day: मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा देऊन जागवा मराठीचा अभिमान!

Maharashtra Day 2024 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

टी-२० वर्ल्डकपसाठी भारताच्या मुख्य संघात रिंकू सिंगला डावललं, नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर आवळला नाराजीचा सूर

"काँग्रेसला सत्तेत आणू नका, नाहीतर तुमच्या संपत्तीवर..." PM नरेंद्र मोदींचा जनतेला इशारा