महाराष्ट्र

सहाय्यक आयुक्तांना मारहाण प्रकरण; शिवसेनेच्या माजी नगरसेवकाला मनसे आमदाराचा पाठिंबा

Published by : Lokshahi News

सूरेश काटे | कल्याणमध्ये मंदिराच्या बांधकामावर कारवाई केल्याच्या रागातून माजी नगरसेवकाने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांना शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली होती. या प्रकरणात आता केडीएमसी कर्मचाऱ्यांनी या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला असला तरी भाजप आणि मनसेने मात्र या माजी नगरसेवक मुकुंद कोट याना पाठिंबा दिला आहे.

कल्याणनजीक असलेल्या मोहने परिसरातील जुन्या गावदेवी मंदिर जीर्ण झाल्याने त्या मंदिराचा जिर्णोद्धार करण्यासाठी स्थानिकांनी मंदिराचे नव्याने बांधकाम सुरु केले. महापालिकेचे सहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी या बांधकामाला बेकायदेशीर ठरवीत कारवाई केली. या कारवाई विरेाधात स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले. माजी नगरसेवक मुकुंद कोट यांनी प्रभाग कार्यालयात पोहचून सहाय्यक आयुक्त सावंत यांच्या कानशीलात लगावली.या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी मुकंद कोट यांच्यासह १५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर राजकारण तापले आहे.

मनसे आमदार राजू पाटील हे घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी कारवाई करण्यात आलेल्या मंदिरात पोहचले. गावकऱ्यांशी त्यांनी या विषयावर चर्चा केली.यावेळी पत्रकारांशी बोलताना आमदार पाटील यांनी सरकार आणि  प्रशासन चालवणारे जे यांचे आका आहेत ते हिंदुत्व विसरलेत,हिंदूं हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी आमच्या गावातील मंदिर तोडलं,अनधिकृत बांधकाम होतात त्यांच्याकडे दुर्लक्ष आहे, मात्र मंदिरावर कारवाईस विरोध करणाऱ्या विरोधात गुन्हे दाखल करता. त्या अधिकाऱ्याने गावाची माफी मागावी, जिथे अनधिकृत बांधकाम सुरू आहेत, तिथे कारवाई करायची नाही,मंदिरावर कारवाई करत असाल तर उद्रेक होणार अशी भूमिका मनसे आमदार राजु पाटील यांनी स्पष्ट केली.

Rohit Pawar : देवेंद्र फडणवीस साहेब खोटं बोलण्याची स्पर्धा लावली तर त्यात तुम्हाला नक्कीच सुवर्णपदक मिळेल

उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळे यांचं प्रत्युत्तर, म्हणाले...

उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

महाविकास आघाडीतील सांगलीच्या वादावर रोहित पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांचा महायुतीला पाठिंबा