महाराष्ट्र

friendship beyond boundaries..!!, सुजय विखे पाटीलांनी पार्थ पवारांचा फोटो शेअर करत केले ट्विट

Published by : Lokshahi News

विखे पाटील आणि पवार या दोन कुटुंबीयांमधले राजकीय वाद हे संपुर्ण महाराष्ट्राला माहित आहेत. दोन्ही कुटुंबातले वाद, एकमेकांशी असलेले राजकीय वैर त्याचे काही दिवसांपूर्वी राजकीय वर्तुळातील पडदास या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राने पाहिल्या आहेत. दरम्यान, काल नगरचे खासदार सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांनी एकाच विमानातून प्रवास केला आणि इम्प्रेस झालेल्या सुजय विखेंनी तो फोटो आपल्या फेसबुकवर शेअर केला आहे.

माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ सुजय विखे पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची काल औरंगाबाद विमानतळावर भेट झाली. सुजय विखे आणि पार्थ पवारांनी एकाच विमानाने प्रवासही केला. औरंगाबाद ते मुंबई असा त्यांचा प्रवास होता. यावेळी त्यांनी एकमेकांसोबत गप्पा मारल्या. काही फोटो देखील काढले.

सुजय विखे पाटलांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ते पार्थ पवार यांच्यासोबत विमानात बसलेले दिसत आहेत. या फोटोला विखे पाटलांनी कॅप्शनही असेच दिलेले आहे. "सर्व सीमांच्या पलिकडची मैत्री" ( friendship beyond boundaries..!!) असे कॅप्शनही त्यांनी या फोटोंना दिलेले आहे. या फोटोवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. काही जणांनी या कमेंट्समध्ये आपली मते मांडली आहेत, तर काही जणांनी या दोघांचीही चांगलीच फिरकी घेतली आहे. तर काही कमेंट्समध्ये या दोघांच्या मैत्रीचे कौतुक केले आहे. आता या दोघांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे.

सरकारनं कांद्यावरील निर्यातबंदी हटवली; बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Yamini Jadhav : प्रचाराला कमी दिवस असले तरी आम्ही महायुतीच्या उमेदवाराच्या दृष्टीकोनातून लोकांपर्यंत पोहचलेलो आहोत

सोशल मीडियावर लक्ष ठेवण्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या सूचना

सरकारनं कांद्यावरील निर्यातबंदी हटवली; रोहित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Lottery: मनमाडमधील ग्राहकाने जिंकली ७ लाख रुपयांची लॉटरी