महाराष्ट्र

समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका थांबेना! क्रश बॅरियरला वाहन धडकले

Published by : Shweta Shigvan-Kavankar

संदीप शुक्ला | बुलढाणा : समृद्धी महामार्गाचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले आहे. पण, अवघ्या दहा दिवसांमध्ये जवळपास पाचपेक्षा जास्त अपघात या समृद्धी महामार्गावर झाले आहेत. आजही समृद्धीवरच्या क्रश बॅरियरला वाहन धडकून मोठा अपघात झाला आहे. यामध्ये चालक जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

समृद्धी महामार्गावरील चॅनेल नंबर 330.7 वर आयशर गाडीला अपघात झाला आहे. यामध्ये गाडी चालक गंभीर जखमी झाला असून त्यावर मेहकर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातग्रस्त गाडी जमशेदपूरकडून भिवंडीकडे जात होती. यावेळी क्रॅश बॅरियरला जोरात धडकल्याने वाहन रस्त्यावर आडवे झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. व क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली आहे.

दरम्यान, एकंदरीत या मार्गाचे सुसाट वेग, गुळगुळीत रस्ते की वाहनचालक यामुळे समृद्धी महामार्गावर अपघात होत आहेत. या मागची कारणे शोधणे गरजेचे बनले आहे.

Sanjay Raut: 'नाशिकमध्ये 800 कोटींचा भूसंपादन घोटाळा' राऊतांचा आरोप

रक्षा खडसे यांच्या प्रचारासाठी एकनाथ खडसे मैदानात

Nashik Crime: नाशिकमध्ये ICICI होम फायनान्समध्ये मोठी घरफोडी

Girgaon Linkedin Post Viral: गिरगावात जॉबसाठी आक्षेपार्ह जाहिरातीमुळे संताप; मराठी माणसालाच केली बंदी

आमदार रोहित पवार यांचा अजित पवार यांच्यावर हल्लाबोल; म्हणाले...