महाराष्ट्र

धक्कादायक! कल्याणमध्ये वायफाय राऊटरचा स्फोट; तीन जण जखमी

Published by : Shweta Shigvan-Kavankar

कल्याण : कल्याण पूर्वेतील नवी गोविंदवाडी परिसरातील राम चौधरी चाळीतील एका घरात वायफाय राऊटरचा ब्लास्ट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर कल्याणमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या ब्लाटप्रकरणी केबल चालकाच्या विरोधात टिळकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहितीनुसार, कल्याण पूर्व नवीन गोविंदवाडी परिसरात राम चौधरी चाळीत राहणाऱ्या सायम शेख यांच्या घरात केबल वायफायच्या राऊटरचा ब्लास्ट झाला. या घटनेत सायम यांची दहा वर्षाची मुलगी नाजमीन ही भाजली आहे. तिचा चेहरा आणि दोन्ही हात भाजले आहेत. तिच्यावर खाजगी रुग्णलायात उपचार सुरु आहेत. सायमा यांच्या शेजारच्या घरात राहणाऱ्या नगमा अन्सारी ही महिला ८० टक्के भाजली आहे. तर तिचा तीन महिन्याचा लहान मुलगा अरमान हा ५० टक्के भाजला आहे. या दोघांना ऐरोली येथील बर्न रुग्णलायात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी केबल चालक राजू म्हात्रे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. केबल चालकाने सुरक्षिततेची काळजी घेतली नसल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

"छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अपमान करेल, त्याला गुडघे टेकायला लावल्याशिवाय राहणार नाही"; नाशिकमध्ये उद्धव ठाकरे कडाडले

"इंडिया आघाडीच्या नादाला लागून उबाठाने पाकिस्तानची हुजरेगिरी केली"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

Daily Horoscope 16 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांना नोकरी-व्यवसायात मिळणार लाभ; पाहा तुमचे भविष्य

"काँग्रेस फक्त हिंदू-मुस्लिमांचं राजकारण करतं"; कल्याणच्या सभेत PM मोदींची तोफ धडाडली

दिनविशेष 16 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना