Pune Mhada Lottery 
पुणे

Pune Mhada Lottery : पुण्यात घर घेण्याचे स्वप्न पाहताय? म्हाडातर्फे 4186 घरांची लॉटरी; आजपासून अर्जप्रक्रिया सुरु

आजपासून अर्जप्रक्रिया सुरु

Published by : Team Lokshahi

थोडक्यात

पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार साकार!

म्हाडातर्फे 4186 घरांची लॉटरी

आजपासून अर्जप्रक्रिया सुरु

(Pune Mhada Lottery) पुणेकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने तब्बल 4,186 घरांसाठी भव्य सोडतीची घोषणा केली आहे. त्यामुळे स्वतःच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. वाढत्या घरांच्या किमती आणि महागाईमुळे अनेकांसाठी घर खरेदी करणे कठीण झाले असले तरी या सोडतीमुळे स्वप्नवत घर मिळवण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

या सोडतीत विविध योजनांमधून घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. पंतप्रधान आवास योजना अंतर्गत 219 घरे, म्हाडा गृहनिर्माण योजनेत 1,683 घरे, 15% सामाजिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत 864 घरे तर 20% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेत 3,322 घरे देण्यात येणार आहेत. यामुळे सर्वसामान्यांपासून मध्यमवर्गीय कुटुंबांपर्यंत सर्वांना आपल्या बजेटनुसार घर घेण्याची संधी मिळणार आहे.

अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. 11 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12:30 पासून अर्ज व अनामत रक्कम भरण्यास सुरुवात झाली असून, अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2025 अशी आहे. बँक RTGS/NEFT द्वारे रक्कम भरण्याची शेवटची संधी 1 नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यानंतर 11 नोव्हेंबरला प्राथमिक यादी जाहीर होईल, 13 नोव्हेंबरपर्यंत दावे-हरकती दाखल करता येतील, तर 17 नोव्हेंबरला अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. अखेरची सोडत 21 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता पार पडणार असून निकाल त्याच दिवशी संध्याकाळी वेबसाईटवर जाहीर केला जाईल.

पारदर्शकता राखण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे. अर्ज नोंदणीपासून रक्कम भरणे आणि निकाल तपासणे, हे सर्व टप्पे अर्जदारांनी अधिकृत संकेतस्थळावरूनच पूर्ण करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. इच्छुकांनी वेळेवर अर्ज करणे आणि आवश्यक कागदपत्रे पूर्ण ठेवणे महत्त्वाचे आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Chhagan Bhujbal On Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा जीआरवरुन भुजबळांचा फडणवीसांवर अप्रत्यक्ष निशाणा

MNS On Kapil Sharma : "मुंबई ऐवजी बॉम्बे..." कपिल शर्माला मनसेचा इशारा

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या निधीबाबत आदिती तटकरे यांची मोठी घोषणा

Beed Crime : पती- पत्नीचा वाद विकोपाला; रागाच्या भरात बापाने उचलेलं टोकाचं पाऊल