ताज्या बातम्या

2 जानेवारीपासून दहावी, बारावीच्या प्रॅक्टिकल परीक्षा; गाईडलाईन्स जारी

Published by : Siddhi Naringrekar

2 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2023 या कालावधीतील विद्यार्थ्यांचे गुण/इंटरनल ग्रेड अपलोड करण्याचे निर्देश बोर्डानं शाळांना दिले आहेत. सर्व विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा वेळेवर पूर्ण करण्याचं आवाहन बोर्डानं शाळांना केलं आहे. बोर्डानं प्रात्यक्षिक परीक्षा आयोजित करण्यासाठी मानक ऑपरेटिंग प्रक्रिया (SoP) आणि मार्गदर्शक तत्त्वं देखील जारी केली आहेत. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं शैक्षणिक सत्र 2022-23 साठी इयत्ता दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. CBSE ने 15 फेब्रुवारी 2023 पासून परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचं म्हणजे, यंदा परीक्षा एकाच टर्ममध्ये घेतली जाणार आहे.

गेल्या वर्षी सीबीएसईनं परीक्षा दोन टर्ममध्ये घेतल्या होत्या. यंदा मात्र तसं होणार नसून परीक्षा एकाच टर्ममध्ये घेतली जाणार आहे. गेल्या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे सीबीएसईनं परीक्षा दोन टर्ममध्ये घेण्याचा निर्णय घेतला होता.विद्यार्थी प्रॅक्टिकल परीक्षा/प्रोजेक्ट असेसमेंट/अंतर्गत मुल्यांकनामध्ये बसू शकतात. जारी केलेल्या नोटीसमध्ये म्हटलं आहे की, 'सर्व विद्यार्थ्यांना सूचना द्या की, त्यांना दिलेल्या वेळापत्रकातच प्रॅक्टिकल परीक्षा द्यावा लागतील. परीक्षेच्या दिवशी कोणत्याही कारणानं गैरहजर राहिलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा निश्चित तारखांमध्ये पुन्हा घेतली जाईल.

बोर्डानं सांगितले की, प्रॅक्टिकल परीक्षेला विद्यार्थी गैरहजर राहिल्यास निकालात विद्यार्थी गैरहजर असल्याचं नोंदवण्यात यावं आणि एखाद्या विद्यार्थ्याची प्रॅक्टिकल परीक्षा इतर कोणत्याही तारखेला घेतली जाणार असेल तर त्याची 'अनुपस्थित' ऐवजी 'रीशेड्यूल' अशी नोंद केली जावी. असे सांगितले आहे.

बिहारमधील एका व्यक्तीने केलं सासूशी लग्न; नेमकं प्रकरण काय?

Avinash Jadhav : मनसेची तिथे 2 लाख मतं आहेत, मनसेच्या मतांच्या जीवावर नरेश म्हस्के निवडून येतील

शिवसेनेकडून कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा

ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेकडून नरेश म्हस्के यांच्या नावाची घोषणा

विशाल पाटील यांच्यावर काँग्रेस पक्ष कारवाई करण्याची शक्यता