A 32-year-old Doctor Working at J.J. Hospital Attempted to End His Life By Jumping Off The Atal Setu : जे.जे. हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या एका 32 वर्षीय डॉक्टरने अटल सेतूवरून उडी मारून आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. रात्री 9:43 च्या सुमारास ही घटना घडल्याचे समजते. उडी मारणाऱ्या व्यक्तीची ओळख डॉ. ओंकार भागवत कवितके (वय 32) अशी झाली असून ते कळंबोली येथील अविनाश सोसायटीमध्ये राहत होते. त्यांनी आपल्या वाहनातून (होंडा अमेझ, MH 46 CM 6837) सेतूवर येत खाडीत उडी घेतल्याचा संशय आहे.
घटनेची माहिती मिळताच सागरी सुरक्षा दलाची 'ध्रुवतारा' बोट, बचाव पथक व अॅम्बुलन्सच्या मदतीने शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. परंतु, अद्याप डॉ. कवितके या बेपत्ता आहेत. सेतूवरील नियंत्रण कक्षाने उडी मारल्याची शक्यता लक्षात येताच संबंधित यंत्रणांनी तातडीने कारवाई केली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना एक iPhone व वाहन आढळून आले. मोबाईलमधील संपर्कांवरून त्यांच्या ओळखीची पुष्टी झाली.
डॉ. कवितके यांच्या कुटुंबीयांमध्ये त्यांच्या बहिणीने कोमल प्रमोद लंबाते पोलिस ठाण्यात येऊन घटनेची माहिती दिली. सध्या पोलिस या घटनेच्या सर्व बाजूंनी चौकशी करत आहेत. त्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणतीही उपयुक्त माहिती असल्यास ती तत्काळ पोलिसांना कळवावी. या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून, अटल सेतूसारख्या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्यावर अशा घटना घडत असल्याने ही बाब गंभीर मानली जात आहे. शोधकार्य युद्धपातळीवर सुरू असून, अधिकृत माहिती लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा...