Kalyan Municipal | tree fell on a rickshaw team lokshahi
ताज्या बातम्या

कल्याणमध्ये रिक्षावर कोसळलं झाड, रिक्षा चालक बचावला

घटनेला महापालिका जबाबदार; नगरसेवक मोहन उगले

Published by : Shubham Tate

कल्याण (अमजद खान) - कल्याणमधील मोहिंदर काबूलसिंग शाळेच्या समोर रिक्षावर झाड कोसळल्याची घटना आज सकाळी घडली. रिक्षा उभी करुन चालक ऑईल आणण्यासाठी गेला होता. त्यामुळे तो बचावला अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. या घटनेत रिक्षाचा चुरा झाला आहे. रिक्षा चालकाचे मोठे नुकसान झाले आहे. (A tree fell on a rickshaw in Kalyan, the rickshaw driver survived)

कोनगावात राहणारे किरण सपकाळ हे रिक्षा चालवतात. ते आज नेहमीप्रमाणो रिक्षा चालवण्याकरीता घराबाहेर पडले. त्यांच्या रिक्षातील ऑईल संपले होते. ते ऑईल घेण्यासाठी मोहिंद काबूल सिंग शाळेच्या समोर रिक्षा उभी करुन ऑईलच्या दुकानात ऑईल आणण्यासाठी गेले. इतक्याक रस्त्याच्या कडेला असलेले चिंचेचे भले मोठे झाड त्यांच्या रिक्षावर कोसळले. हे पाहून नागरिकांनी रिक्षाच्या दिशेने धाव घेतली. रिक्षात चालक सपकाळ नव्हते. त्यामुळे त्यांचे प्राण वाचले. रिक्षाची मोठी हानी झाली आहे. सपकाळ यांनी सांगितले की, रिक्षाचा विमा आहे. विमा कंपनीला रिक्षाचे नुकसान झाल्याचे कळवले आहे. ते रिक्षाची पाहणी करुन गेले आहेत. मात्र आत्ता रिक्षा गॅरेजमध्ये किमान 15 दिवस उभी करुन दुरुस्त करुन घ्यावी लागेल. त्यामुळे पंधरा दिवस हाताला काम नसणार.

दरम्यान, या घटनेची माहिती कळताच स्थानिक शिवसेनेचे माजी नगरसेवक मोहन उगले यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी सांगितले की, रस्त्याच्या कडेला असलेली धोकादायक झाडे तोडण्यासाठी शाळेने पत्र व्यवहार केला होता. तसेच नगरसेवक या नात्याने मी देखील पाठपुरावा केला होता. त्याची दखल महापालिकेच्या उद्यान विभागाने घेतली नाही. त्यामुळे ही आज ही घटना घडली. या घटनेला महापालिका जबाबदार आहे. महापालिकेने धोकादायक झाडे तोडण्यासाठी एजेन्सी नेमली आहे. तिला आज वर्क ऑर्डर दिल्याची माहिती उद्यान अधीक्षक संजय जाधव यांनी दिली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा