ताज्या बातम्या

श्रध्दाचे कपडे, मोबाईल कुठे? आफताबने नार्को टेस्टमध्ये दिली माहिती

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब पुनावालाची आज नार्को टेस्ट करण्यात आली.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नवी दिल्ली : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब पुनावालाची आज नार्को टेस्ट करण्यात आली. या नार्कोटेस्टमध्ये आफताबने श्रद्धाच्या हत्येची कबुली दिली आहे. सोबतच तिचे कपडे आणि मोबाइल कुठे फेकला ती ठिकाणेही सांगितली. यानुसार दिल्ली पोलीस पुन्हा एकदा आफताबने सांगितलेल्या जागांवर पुराव्यांचा शोध घेणार आहे.

दिल्ली पोलिसांनी गुरुवारी सकाळी आफताबला तिहाड जेलमधून आंबेडकर हॉस्पिटलला घेऊन गेले. तिथे आफताबच जनरल मेडिकल चेकअप केलं गेलं. त्यांनतर आफताबची नार्कोटेस्ट केली गेली. एफ. एस. एल. च्या असिस्टंट डायरेक्टर संजीव गुप्ता यांनी आफताबने नार्कोटेस्टमधेही श्रद्धाच्या हत्येची कबुली दिल्याचे सांगितले. एवढच नाही तर त्याने श्रद्धाचे कपडे आणि मोबाईल कुठे फेकले हेही सांगितल. सोबतच त्याने श्रद्धाच्या शरीराचे तुकडे करण्यासाठी कोणती हत्यारं वापरली आणि ती कुठे फेकली हेही सांगितलं आहे. आता यानंतर दिल्ली पोलीस पुन्हा एकदा आफताबने सांगितलेल्या जागांवर पुराव्यांचा शोध घेणार आहे.

नार्कोटेस्टच्या अहवालाला न्यायालयात महत्व नाही

आफताबने नार्कोटेस्ट मध्ये श्रद्धाच्या हत्येची आणि त्यासंबंधित इतर माहितीची कबुली दिलेली असली तरी त्या माहितीला न्यायालयात पुरावा म्हणून वापरात आणता येऊ शकणार नाही. दरम्यान, पॉलिग्राफी आणि नार्कोटेस्टमुळे पोलिसांना या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मदत होईल. आता या प्रकरणात आफताबने सांगितलेल्या ठिकाणांवरुन पोलीस श्रद्धाचा मोबाईल आणि कपडे हस्तगत करू शकली तर ही श्रद्धा हत्याकांड प्रकरणातील पोलिसांच्या तपासातील मोठी यशस्वी कामगिरी असेल.

काय आहे प्रकरण?

मुळची वसईतील श्रद्धा वालकर आणि तिचा प्रियकर आफताब दिल्लीत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. परंतु, काही दिवसांमध्येच दोघांमध्ये भांडण सुरु झाले. या दरम्यान आफताब याने १८ मे रोजी श्रद्धाचा गळा आवळून हत्या केली व तिच्या शरीराचे ३५ तुकडे करून दररोज एक एक तुकडा जंगलात फेकल्याचेही सूत्रांकडून कळते. आफताब पूनावाला याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर केले असता त्याने हत्येची कबुली दिली होती. जे झाले ते रागाच्या भरात झाले, असे त्याने न्यायालयात म्हंटले होते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा