Indian Navy Recruitment  team lokshahi
ताज्या बातम्या

Indian Navy Recruitment 2022 : मोठी घोषणा, अग्निवीरच्या पहिल्या तुकडीत 20% महिलांचा समावेश

कोण अर्ज करू शकतो? पगार किती असेल?

Published by : Shubham Tate

Navy Agniveer Recruitment 2022 : अग्निपथ योजनेअंतर्गत सैन्यात भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत भारतीय नौदलात भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 01 जुलै 2022 पासून सुरू झाली आहे. यामध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 22 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. जारी अधिसूचनेनुसार, नौदलातील अग्निवीरांच्या भरतीमध्ये, पहिल्या तुकडीत 20 टक्के उमेदवार महिला असतील. अग्निपथ योजनेअंतर्गत नौदलातही महिलांची भरती केली जात आहे. अग्निवीर SSR साठी अर्ज करण्यासाठी, जॉईन नेव्ही - joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. (agniveer indian navy recruitment 2022 first batch 20 percent women candidates agneepath navy apply)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नेव्हीमध्ये अग्निवीर होण्यासाठी अग्निपथ योजनेअंतर्गत नौदलाच्या अग्निवीर एसएसआर पदांसाठी 10 हजारांहून अधिक महिला उमेदवारांनी नोंदणी केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 2800 पदांसाठी भरती करण्यात येत आहे. यामध्ये महिला उमेदवारांसाठी 560 जागा ठेवण्यात आल्या आहेत.

भारतीय नौदलातील अग्निवीर भरती: नोंदणी कशी करावी

नोंदणीसाठी, प्रथम joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा.

त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे नोंदणी करा.

पुढे तुमच्या नोंदणीकृत आयडीने वेबसाइटवर लॉग इन करा.

नोंदणी केल्यानंतर तुम्ही अर्ज भरू शकता.

कोण अर्ज करू शकतो?

भारतीय नौदलात अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीर SSR आणि अग्निवीर MR या पदांवर भरती केली जाईल. अग्निवीर 12वी उत्तीर्ण युवक एसएसआरसाठी अर्ज करू शकतात आणि 10वी उत्तीर्ण तरुण एमआरसाठी अर्ज करू शकतात. कमाल वयोमर्यादा 23 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. या वर्षासाठी 23 वर्षे वयोमर्यादा आहे, पुढील वर्षीपासून ती 21 वर्षेच राहील.

पगार किती असेल?

भारतीय नौदलातील अग्निवीरचा पगार पहिल्या वर्षी 30 हजार रुपये असेल. दुसऱ्या वर्षी 33 हजार रुपये आणि तिसऱ्या वर्षी 36 हजार रुपये आणि चौथ्या वर्षी 40 हजार रुपये मिळतील. मात्र, पगारातील 30 टक्के रक्कम अग्निवीर कॉर्प्स फंडासाठी कापली जाईल. तसेच केंद्र सरकारही या निधीत टाकणार आहे. चार वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर कॉर्पस फंडात जमा केलेली रक्कम निवृत्तीच्या स्वरूपात व्याजासह उपलब्ध होईल.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : वाशिम जिल्ह्यात सलग 7 दिवसांपासून मुसळधार पाऊस

Ind Vs Eng Mohammed Siraj : इंग्लंडचा कार्यक्रम केला! मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या 2 महत्त्वाच्या विकेट घेतल्या अन् पाहा काय झाल

Mobile Hang Problem: मोबाईल सतत होतोय हँग? जाणून घ्या कारण...

ITR फाइल करताना 'या' चुका कटाक्षाने टाळा, अन्यथा होऊ शकतो लाखोंचा दंड