ताज्या बातम्या

वारिसे मृत्यू प्रकरणाचा मुद्दा अधिवेशनात उपस्थित करणार - अजित पवार

कोकणात मुंबई गोवा महामार्गावर राजापूर येथे झालेल्या अपघाताला आता वेगळ वळण मिळाले आहे.

Published by : Siddhi Naringrekar

कोकणात मुंबई गोवा महामार्गावर राजापूर येथे झालेल्या अपघाताला आता वेगळ वळण मिळाले आहे. रिफायनरी समर्थक पंढरीनाथ आंबेरकर यांच्या विरोधात बातमी देणारे पत्रकार शशिकांत वारीशे यांना गाडीने उडवण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याच पार्श्वभूमीवर पत्रकार शशिकांत वारिसेंच्या मृत्यू प्रकरणी अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार म्हणाले की, कोकण विभागातल्या पत्रकाराला ज्या प्रकारे संपवण्याचा एक अॅक्सिडेंट दाखवला गेलाय याचा मधला कोण मास्टरमाईंड आहे हे कळलं पाहिजे. सरकार काय करतेय. पोलिस यंत्रणा काय करतेय. सगळे झोपा काढत आहेत का? असे अजित पवार म्हणाले.

यासोबतच ते म्हणाले की, 27 तारिखपासून होणाऱ्या बजेट अधिवेशनामध्ये या विषयावर आम्ही आवाज उठवणार आहोत. वारिसे मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राखण्यात सरकार अपयशी आहे. असे अजित पवार म्हणाले आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadnavis on Thackeray Brothers : "ब्रँडचा बॅन्ड वाजवला" मुख्यमंत्र्यांनी ठाकरे बंधूंना खोचक टोला

आजचा सुविचार

North Korea Ban Ice Cream Word : उत्तर कोरियात ‘आईस्क्रीम’ शब्द नॉट अलाऊट! किम जोंग उनचा नवा हुकूम

Lipstick Shades : जाणून घ्या, कोणत्या स्किन टोनवर कोणती लिपिस्टिक सुंदर दिसते