Aurangzeb grave is Closed for tourist
Aurangzeb grave is Closed for tourist  Team Lokshahi
ताज्या बातम्या

Breaking : औरंगजेबाची कबर पर्यटकांसाठी बंद! वादानंतर प्रशासनाचा मोठा निर्णय

Published by : Sudhir Kakde

औरंगाबाद | सचिन बडे : ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहाद्दुल मस्लमीन (AIMIM) पक्षाचे नेते आमदार अकबरुद्दीन ओवैसी (Akbaruddin Owaisi) हे काल औरंगाबादेत (Aurangabad) आले होते. ओवैसी स्कुल ऑफ एक्सलेंस या शाळेच्या भुमिपुजन कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी ते उपस्थित होते. या कार्यक्रमाला जाण्यापूर्वी ते खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीवर देखील गेले होते. याठिकाणी त्यांनी औरंगजेबाच्या कबरीला वंदन करत फूल वाहिली. यावरुन सध्या महाराष्ट्रात राजकारण सुरु आहे. त्यातच आता प्रशासनाने मोठा निर्णय घेतला असून, औरंगजेबाची कबर पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहे. (Aurangzeb grave is Closed for tourist)

भाजपसह वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांनी औरंगजेबाच्या या कबरीवर माथा टेकवणाऱ्या ओवैसींच्या कृत्याचा निषेध केला होता. तर महाविकास आघाडीला देखील यावरुन घेरण्याचा प्रयत्न भाजप आणि मनसेकडून करण्यात आला आहे. त्यामुळे आता या प्रकरणावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता असतानाच प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

नितेश राणे यांनी अत्यंत आक्रमक होत ओवैसींवर घणाघात केला आहे. "ओवैसी नावाचे दोन हलकट जोपर्यंत ह्या देशात आहेत तोपर्यंत ते हिंदुना डिवचत राहणार. या दोघांना उघडे नागडे फेकले पाहिजे, त्या औरंगजेबच्या ठिकाणी राज्य सरकारने शौचालय उभारून तुम्ही कोणाची अवलाद आहात हे दाखवून द्या." अशी मागणी निलेश राणे यांनी केली आहे. तर मोहित कंबोज यांनी देखील ओवैसींवर निशाणा साधत त्यांच्यावर कारवाई का करत नाही असा सवाल करत महाविकास आघाडीला देखील घेरण्याचा प्रयत्न केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या धर्तीवर येऊन एक कुत्रा औरंगजेबाच्या कबरीवर जातो. जातो तर जातो अन् महाराष्ट्रातील हिंदुंना आव्हान देतो. एरवी हनुमान चालिसा आणि जय श्री राम म्हणणाऱ्यांवरही पोलीस आणि ठाकरे सरकार कारवाई करतं, लोकांना अटक होते. मात्र त्यांच्यावर कुणीही कारवाई करत नाहीये. खुर्चीसाठी तुम्ही विचारसरणी सोडली. भोंग्याचा विषय असेल तर 1000 मशिदींना परवानगी दिल्यावर 20-25 मंदिरांना परवानगी मिळते. ओवैसींवर कारवाई का झाली नाही? पोलीस एवढे लाचार आहेत का? ठाकरे सरकार एवढं लाचार आहे का? जर तुम्ही लाचार असाल तर 15 मिनिटांसाठी पोलीस हटवा, त्यांना हिंदू दोन हात करुन उत्तर देतो असं कंबोज म्हणाले आहेत.

"छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं असेल, तर..."; अमोल कोल्हेंनी भाजपवर डागली तोफ

देश तोडण्याची भूमिका घेणाऱ्या काँग्रेसला अमित शहांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले; "भारताचं विभाजन..."

Jayant Patil : भुजबळ साहेब नाराज हे आम्ही ऐकून आहे

Summers: उन्हातून घरी आल्यावर चुकूनही करू नका 'या' गोष्टी...

India Alliance Meeting : बीकेसीत इंडिया आघाडीचं शक्तिप्रदर्शन, मविआ उमेदवारांच्या प्रचारासाठी होणार सभा