Bachchu Kadu Team Lokshahi
ताज्या बातम्या

राष्ट्रवादी सोबत आल्याने शिंदे गटातील आमदारांची गोची; बच्चू कडूंची खदखद

राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत सोबत घेतांना त्यांच मंथन आणि चिंतन व्हायला पाहिजे होतं तर विचारात व विश्वासात न घेता राष्ट्रवादीला सोबत घेतलं असा दावा शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी केला

Published by : shweta walge

सुरज दाहाट/अमरावती; राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत सोबत घेतांना त्यांच मंथन आणि चिंतन व्हायला पाहिजे होतं तर विचारात व विश्वासात न घेता राष्ट्रवादीला सोबत घेतलं असा दावा शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी केला, तर राष्ट्रवादीला सोबत सरकारमध्ये घेतल्यानेआता एकनाथ शिंदे सोबत असणाऱ्या सर्व आमदारांची गोची झाली आहे.

माविआ सरकारमध्ये राष्ट्रवादीचा त्रास होता, काम होत नव्हती. शिवसेनेचे मतदार संघ फोडून त्यांच्या मतदारसंघाची बांधणी होत होती असा आरोप होता. मात्र त्या आरोपाला आता छेद लावण्याचा प्रयत्न आहे. तर ज्यांनी हा उठाव केला त्यांनीच आपल्या डोक्यावर ही कुऱ्हाड मारून घेऊ नये. त्यांचं आयुष्य पणाला लावता कामा नये. सत्तेसाठी काही पण असं होऊ नये याची आम्हाला अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रियाआमदार बच्चू कडू यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस मधील बंडावर आमदार बच्चू कडू यांची प्रतिक्रिया

शरद पवारांनी पक्ष उभारण्यासाठी जी मेहनत घेतली त्यामुळे झालेल्या बंडाचं दुःख मोठ आहे कारण शरद पवार साहेबांना झालेल्या वेदना लहान नाहीत. त्याच सांत्वन आम्ही करतो तर या उठावाची सुरुवात उद्धव ठाकरेंनी केली. त्यानंतर शिंदे आणि आता अजित पवार यांनी केली तर सगळ्या उठावाचे भिष्मपिता शरद पवार आहेत असा दावाही कडू यांनी केला तसेच हे बंड शरद पवारसाठी नवीन नाही तसेच बदलत्या राजकारणात अजित पवार यांनी उचलेल पाऊल अभीनंदन पात्र आहे असेही बच्चू कडू म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा