ताज्या बातम्या

जे आपल्या 40 आमदारांना सांभाळू शकत नाही, ते वंचित सोबतची युती किती दिवस सांभाळतील - चंद्रशेखर बावनकुळे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा मुहूर्त साधून आज शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा केली जाणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा मुहूर्त साधून आज शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा केली जाणार आहे. या युतीच्या निमित्ताने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने शिवसेनेच्या वतीनं आज राज्यात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केलं आहे. हाच मुहूर्त साधून शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा केली जाणार आहे. आज दुपारी 1 वाजता यासंबंधित एक पत्रकार परिषद होणार आहे.

याच पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना आता लोकशाही आठवतेय. आता ते मातोश्रीच्या बाहेर पडायला लागलेत. मोदी यांनी त्यांना लोकशाहीपर्यंत आणलंय, असं सांगतानाच उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाची मुदत आज संपतेय. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा आजपासून शिल्लक सेनेचे पक्षप्रमुख असा उल्लेख करता येईल. असे बावनकुळे म्हणाले.

यासोबतच ते म्हणाले की, जे आपल्या 40 आमदारांना सांभाळू शकत नाही, आपलं घर सांभाळू शकत नाही. ते वंचित सोबतची युती किती दिवस सांभाळतील याची मला शंका आहे. प्रकाश आंबेडकर प्रगल्भ नेते आहेत. त्यांची ठाकरे गटासोबत युती फार काळ टीकणार नाही. प्रकाश आंबेडकर एक दिवस कंटाळणार. कारण उद्धव ठाकरे यांचा संवाद नाही. संवाद करणं हे त्यांच्या रक्तात नाही. युती टिकवायला मनाचं मोठंपण लागतं. समर्पण लागतं. युती टिकवायचे हे गुण उद्धव ठाकरे यांच्याकडे नाहीत. उद्धव ठाकरे घराच्या बाहेरच निघत नाही. असे म्हणत बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींनी घाईघाईने निर्णय घेऊ नका, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Meenatai Thackeray Statue : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत

Latest Marathi News Update live : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत