ताज्या बातम्या

धक्कादायक! चक्क समोशात आढळले कंडोम, खडे आणि तंबाखू

Published by : shweta walge

पुण्यातील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील एका ऑटोमोबाईलच्या कँटिनमध्ये कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या समोशात कंडोम, तंबाखू आणि दगड आढळले आले. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.

पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये घडलेल्या या प्रकरणाची तपास करताना पोलिसांनी सांगितलं की, पोलिसांनी सांगितलं की, हे प्रकरण २७ मार्चला समोर आलं. जेव्हा कँटिनमध्ये कर्मचारी समोसा खात असताना त्यामध्ये कंडोम, गुटखा, पान मसाला आणि काही दगड आढळून आले. कॅटरिंग कंपनीने या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली असून चौकशी केली जात आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करत एकाला अटकसुद्धा केली आहे.

पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, तपासात असं समजलं की कॅटरिंगच्या ठेकेदाराने एका दुकानातून समोसे पुरवण्यासाठी ठेका दिला होता. पण कर्मचाऱ्यांमधून तक्रारी आल्यानंतर त्याचं टेंडर रद्द केलं होतं. दुसऱ्याला याचं कंत्रात दिल्यानं तो दुकानदार चिडला. त्याने राग काढण्यासाठी समोस्यात इतर गोष्टी मिसळून बदनामीचा प्रयत्न केला.

साताऱ्यातील मिनी काश्मीर आणि महाबळेश्वरमध्ये बरसला अवकाळी पाऊस

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा