NDRF | Delhi Accident team lokshahi
ताज्या बातम्या

दिल्लीत बांधकाम सुरू असलेल्या गोदामाची भिंत कोसळली, 5 जणांचा मृत्यू

10 जणांना वाचवण्यात यश, बचावकार्य सुरू

Published by : Shubham Tate

राजधानी दिल्लीतील अलीपूर भागातील बकोली गावात शुक्रवारी एका बांधकाम सुरू असलेल्या गोदामाची भिंत अचानक कोसळली. मिळालेल्या माहितीनुसार या भिंतीखाली अनेक लोक दबले गेले आहेत. (delhi city under construction warehouse wall collapse in bakoli village)

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक लोक अडकल्याची भीती आहे. दिल्ली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अलीपूरमध्ये एक भिंत कोसळली. अपघातानंतर घटनास्थळावरून सुमारे 10 जणांना वाचवण्यात यश आले असून यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आणखी काही लोक अडकल्याची शक्यता पाहता घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.

बचावकार्य सुरू आहे

अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. एनडीआरएफची टीमही घटनास्थळी पोहोचली आहे. क्रेन आणि बुलडोझरच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे. हे गोदाम नरेलाचे आमदार शरद चौहान यांचे असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शोक व्यक्त केला

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अलीपूर दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करून लिहिले की, "अलीपूरमध्ये एक दुःखद दुर्घटना घडली आहे. जिल्हा प्रशासन मदत आणि बचाव कार्यात करत आहे. मी वैयक्तिकरित्या मदत कार्यावर लक्ष ठेवून आहे. मृतांच्या आत्म्याला शांती मिळो यासाठी देवाकडे प्रार्थना करतो."

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा