Baramati : पुतण्याने काकांना भेटणं टाळलं! ; Baramati : पुतण्याने काकांना भेटणं टाळलं! ;
ताज्या बातम्या

Baramati : पुतण्याने काकांना भेटणं टाळलं! ; अजित पवारांच्या अनुपस्थितीने राजकीय चर्चांना उधाण

अजित पवार अनुपस्थितीने बारामतीत राजकीय चर्चांना उधाण, निवडणुकीवर परिणामाची शक्यता.

Published by : Riddhi Vanne

(Sharad Pawar - Ajit Pawar ) बारामती Baramati येथील विद्या प्रतिष्ठानच्या Vidya Pratishthan वतीने आयोजित कृषी कार्यशाळेत Agricultural Workshop उपमुख्यमंत्री अजित पवार Deputy Chief Minister Ajit Pawar गैरहजर राहिले. या कार्यशाळेत "AI वर आधारित पीक व्यवस्थापन आणि फिनो पाइपिंग Fino Piping” या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. कार्यशाळेचे उद्घाटन माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार Agriculture Minister MP Sharad Pawar यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे MP Supriya Sule सुद्धा उपस्थित होत्या. अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाचे शास्त्रज्ञ सहभागी झाले होते. कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञान, सिंचन व्यवस्था आणि पाणी व्यवस्थापनावर यावेळी सखोल चर्चा करण्यात येणार आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अनुपस्थितीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. येत्या दोन दिवसांत माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक Cooperative sugar factory election पार पडणार आहे. यामध्ये शरद पवार Sharad Pawar आणि अजित पवार Ajit Pawar समर्थक गट आमनेसामने आहेत. या पार्श्वभूमीवर आज एकाच मंचावर दोघे एकत्र आले, तर याचे पडसाद निवडणुकीवर उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही विश्लेषकांच्या मते, निवडणूक निकालावर परिणाम होऊ नये म्हणूनच कदाचित अजित पवारांनी बारामतीमधील उपस्थिती टाळली असावी. आज अजित पवार यांनी माळेगावमध्ये कारखान्याच्या कामगारांशी थेट संवाद साधत प्रचाराला प्राधान्य दिले. त्यांच्या भेटीने माळेगाव निवडणुकीचे राजकारण अधिक तापले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Malegaon Bomb Blast : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा आज निकाल; 17 वर्षांनी न्याय मिळणार का?

Kailas Gorantyal : कैलास गोरंट्याल आज भाजपमध्ये प्रवेश करणार

Latest Marathi News Update live : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; 20 ते 25 मिनिटं उशिराने

Malad : हस्ताक्षर खराब असल्याने संतापलेल्या शिक्षिकेने 8 वर्षांच्या मुलाला दिली 'ही' शिक्षा; वाचून धक्का बसेल