pension | E-Shram Team lokshahi
ताज्या बातम्या

E-Shram : आता छोट्या दुकानदारांची मजा, दरमहा मिळणार 3,000 पेन्शन

योजनेचा लाभ घेणाऱ्यांकडे ई-श्रम कार्ड असणे आवश्यक

Published by : Team Lokshahi

E-Shram : तुम्ही जर स्वयंरोजगार असाल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. कारण केंद्र सरकारने अशा छोट्या दुकानदारांसाठी एनपीएस ट्रेडर्स योजना सुरू केली आहे. ज्या अंतर्गत लहान दुकानदार किंवा स्वयंरोजगारासाठी 3,000 रुपये पेन्शनची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, जे लोक ई-श्रम कार्डधारक आहेत तेच या पेन्शनचा लाभ घेऊ शकतील. या योजनेचे पूर्ण नाव व्यापारी आणि स्वयंरोजगार व्यक्तींसाठी राष्ट्रीय पेन्शन योजना आहे. मिळालेल्या माहितीनुसार, किरकोळ गावातील गल्लीबोळातील दुकानदार, छोटी कामे करणाऱ्यांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. पात्र लोक या योजनेत सहभागी होऊन योजनेचा लाभ घेऊ शकतात. (e shram now small shopkeepers pension of rs 3000 every month)

योजना आवश्यक

ई-श्रम पोर्टलवर एनपीएस ट्रेडर्स स्कीमची माहिती दिली आहे. माहितीनुसार, एनपीएस ट्रेडर्स स्कीमसाठी अर्ज करण्याचे वय १८ ते ४० दरम्यान असावे. तसेच, अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 1.5 कोटींपेक्षा जास्त नसावे. या योजनेत सामील होऊ इच्छिणारा अर्जदार NPS, ESIC किंवा EPFO ​​चा सदस्य नसावा. तसेच, अर्जदार आयकराच्या कक्षेत येऊ नयेत. म्हणजेच, कमाईवर कोणतेही कर दायित्व नसावे. जर कर दायित्व असेल तर ते या योजनेचा लाभ घेण्यास अपात्र मानले जातील. तुम्ही या सर्व पात्रता पूर्ण केल्यास तुम्ही योजनेचे लाभार्थी होऊ शकता.

मिळालेल्या माहितीनुसार, ही एक स्वैच्छिक पेन्शन योजना आहे. ज्यामध्ये कोणत्याही व्यक्तीला सामील व्हायचे असल्यास सामील होऊ शकता. एका आकडेवारीनुसार, देशात सुमारे 35 कोटी व्यापारी स्वयंरोजगार करणारे लोक आहेत. एनपीएस ट्रेडर्स स्कीममध्ये या लोकांना पेन्शनचा लाभ द्यायचा आहे. या योजनेत सामील होणाऱ्यांना वयाच्या ६० वर्षांनंतर दरमहा ३००० रुपये पेन्शन मिळेल. ही पूर्णपणे ऐच्छिक अंशदायी पेन्शन योजना आहे. म्हणजेच या योजनेत अर्जदाराला दरमहा काही रुपये जमाही करावे लागतील. तरच त्याला पेन्शन मिळू शकेल.

सरकारने स्वयंरोजगारासाठी योजना सुरू केल्या

योजनेचा लाभ घेणाऱ्यांकडे ई-श्रम कार्ड असणे आवश्यक आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Chhatrapati Sambhajinagar : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप; 375 गावांमध्ये 'अर्ज द्या, कर्ज घ्या' उपक्रम राबवला

OnePlus Nord 5 : वनप्लसची नवी उत्पादने जागतिक बाजारपेठेत दाखल; स्मार्टफोनसह इअरबड्स, टॅबलेट, पॅड आणि स्मार्ट वॉच लाँच

Dhurandhar Film : रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ चित्रपटात ‘राहुल गांधी’ नाव पाहून गोंधळ; जाणून 'घ्या' Fact Check

Teachers Protest : अधिवेशन संपेपर्यंत शिक्षकांच्या खात्यात जमा होणार इतका पगार; गिरीश महाजन यांनी दिले आश्वासन