ताज्या बातम्या

दहावी-बारावीचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

राज्य मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

Published by : shweta walge

राज्य मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार बारावीच्या विद्यार्थ्यांना १५ नोव्हेंबरपर्यंत, तर दहावीच्या विद्यार्थ्यांना २५ नोव्हेंबरपर्यंत नियमित शुल्क देऊन अर्ज भरता येणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे.

परीक्षा देण्यासाठी इच्छुक असणारे नियमित विद्यार्थी, व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी; तसेच श्रेणीसुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे (आयटीआय) ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज शाळा, महाविद्यालयांमार्फत ऑनलाइन पद्धतीने www.mahahsscboard.in या वेबसाइटवर भरायचे आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मुख्यमंत्री आज नवी मुंबई विमानतळाची पाहणी करणार

Iran : इराणने देशाबाहेर काढले 5 लाखांहून अधिक अफगाणी नागरिक; नेमकं कारण काय?

Chhatrapati Sambhajinagar : 'समृद्धी'च्या टोलनाक्यावर गोळीबार; एकजण गंभीर जखमी

Rohit Pawar : रोहित पवारांविरोधात ईडीची कारवाई; काय आहे नेमकं प्रकरण?