Viral Video|social media team lokshahi
ताज्या बातम्या

उद्घाटनावेळीच पूल कोसळला, महापौरांसह अनेकजण पडले नाल्यात, पाहा व्हिडिओ

व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल

Published by : Shubham Tate

भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांचा फटका साध्या माणसांना सहन करावा लागतो. रस्तेबांधणी असो, फूट ओव्हर ब्रिज असो किंवा कोणत्याही भागात सरकारी खात्याने केलेले बांधकाम असो. अशी प्रकरणे आपल्या देशात अनेकदा पाहायला मिळतात. परंतु, इतर देशांतील लोकही याला अपवाद ठरत आहेत. याचे ताजे उदाहरण नुकतेच मेक्सिकोमध्ये पाहायला मिळाले. येथे उद्घाटनासोबतच एक झुलता पूल कोसळला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर (social media) चांगलाच व्हायरल होत आहे. (hanging bridge collapsed at inauguration in mexico video viral)

ही घटना मेक्सिकोच्या कुर्नावाका शहरातील आहे. मेक्सिकोच्या क्वेर्नावाका शहरात मंगळवारी एका झुलत्या पुलाचे उद्घाटन होणार होते. उद्घाटनासाठी नगराध्यक्षांसह शहरातील अनेक अधिकारी व नागरिक पोहोचले होते. पुलाचे उद्घाटन झाले, त्यानंतर लोक त्यावर चालायला आ तेव्हाचं हा पुल कोसळला.

संपूर्ण झुलता पूल खालून वाहणाऱ्या नाल्यात पडला. या अपघातावेळी महापौरांसह इतर अनेकजण उपस्थित होते. लाकडी फलकांनी बनवलेला हा लटकणारा पूल इतका कमकुवत होता की तो 20 जणांचे वजन पेलू शकत नव्हता. या नाल्यात खडक आणि मोठे दगडही होते. सुदैवाने या अपघातात कोणाचाही मृत्यू झाला नाही. जखमींमध्ये नगर परिषद सदस्यांसारख्या स्थानिक अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Monorail : मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार; MMRDAने घेतला महत्त्वाचा निर्णय

Latest Marathi News Update live : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा

Raj Thackeray - Devendra Fadnavis : राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Pune : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव राजगड; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ऐतिहासिक निर्णय