ताज्या बातम्या

प्रसिद्ध उद्योजक अनिल अंबानी यांना आयकर विभागाची नोटीस

प्रसिद्ध उद्योजक अनिल अंबानी यांना आयकर विभागाची नोटीस आल्याची माहिती मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

प्रसिद्ध उद्योजक अनिल अंबानी यांना आयकर विभागाची नोटीस आल्याची माहिती मिळत आहे. कर चुकवल्याचा ठपका ठेवत आयकर विभागाने ही नोटीस पाठवली आहे. अनिल अंबानी यांनी 814 कोटी रुपयांची माहिती लपवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. इन्कम टॅक्स विभागानं अनिल अंबानी यांना जारी केलेल्या नोटिसनुसार त्यांना ३१ ऑगस्टपर्यंत उत्तर देण्यास सांगितलं आहे. दरम्यान, पीटीआयनं यासंदर्भात अनिल अंबानी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्याकडून कोणतंही उत्तर मिळालं नाही. अनिल अंबानी यांच्यावर असेसमेंट इयर २०१२-१३ पासून २०१९-२० पर्यंत परदेशात ठेवण्यात आलेल्या संपत्तीवर कर चोरीचा आरोप करण्यात आला आहे.

अनिल अंबानी या कंपनी आणि कंपनीच्या फंडचे अल्टिमेटम बेनेफिशिअल ऑनर असल्याचं इन्कम टॅक्स विभागाचं म्हणणं आहे. या कंपनीला २०१२ मध्ये बहामासमध्ये रजिस्टर्ड कंपनी पीयूएसएकडून १० कोटी डॉलर्स मिळाले होते. अंनिल अंबानी यांनी तोच फंड सेटल केला आणि ते त्याचे लाभार्थी होते. कर अधिकाऱ्यांनुसार दोन्ही स्विस बँकांचे खात्यात ८१४ कोटी रूपये आहेत आणि त्यावर ४२० कोटी रूपयांचा कर द्यावा लागेल.

अनिल अंबानी यांनी जाणूनबुजून कर चुकवल्याचा आरोप आयकर विभागाने केला आहे. विभागाच्या म्हणण्यानुसार, अंबानी यांनी विचारपूर्वक रणनीती अंतर्गत परदेशी बँक खात्यात जमा केलेल्या रकमेबद्दल भारतीय कर अधिकाऱ्यांना माहिती दिली नाही. British Virgin Islands मध्ये जुलै 2010 मध्ये नोंदणीकृत झालेल्या कंपनीने झुरिच येथील बँक ऑफ सायप्रसमध्ये खाते उघडले. अनिल अंबानी हे या कंपनीचे आणि कंपनीच्या निधीचे अंतिम लाभार्थी मालक असल्याचा आरोप आयकर विभागाने केला आहे. या कंपनीला 2012 मध्ये PUSA या बहामामध्ये नोंदणीकृत असलेल्या कंपनीकडून 10 कोटी डॉलरचे मिळाले होते. अनिल अंबानी हे त्याचे लाभार्थी होते. कर अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही स्विस बँक खात्यांमध्ये एकूण 814 कोटी रुपये जमा असून त्यावर 420 कोटी रुपयांचा कर लागू होतो.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ganesh Festival 2025 : गणेशोत्सवापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराचा गोड प्रसाद

Manikrav Kokate : रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी जिनॅस्ट संयुक्ताला क्रीडामंत्र्यांचा फोन; 'महाराष्ट्राची हिरकणी' म्हणून संबोधत गौरविले

Palghar Gas Leak : बोईसर तारापूर MIDC मध्ये पुन्हा वायुगळती; 4 कामगारांचा मृत्यू तर 1 जखमी

Ganesh Festival Pune 2025 : बाप्पा पावला! गणेशोत्सवात 24 तास धावणार मेट्रो, एकदा पाहा वेळापत्रक