ताज्या बातम्या

Kargil Vijay Diwas : कारगिल विजय दिवसाचा इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या?

भारतामध्ये दरवर्षी 26 जुलै हा कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.

Published by : Team Lokshahi

Kargil Vijay Diwas : 1999 मध्ये कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानवर (Pakistan) मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ दरवर्षी 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस (Kargil Vijay Diwas) साजरा केला जातो. भारतामध्ये दरवर्षी 26 जुलै हा कारगिल विजय दिवस (Kargil Vijay Diwas 2022) म्हणून साजरा केला जातो. कारगिल विजय दिवस हा स्वतंत्र भारतातील सर्व देशवासियांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. 1999 साली भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यामध्ये कारगिल युद्ध झाले, जे सुमारे 60 दिवस चालले आणि 26 जुलै रोजी ते संपले, त्यात भारताचा विजय झाला. कारगिल विजय दिवस हा या युद्धात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.

युद्धादरम्यान, भारतीय लष्कराने (Indian Army) पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून लावले आणि "ऑपरेशन विजय" (Operation Vijay) चा भाग म्हणून टायगर हिल आणि इतर सर्व चौक्यांवर कब्जा करण्यात भारतीय सैनिकांना यश मिळवले होते. ही लढाई लडाखच्या (Ladakh) कारगिलमध्ये 60 दिवसांहून अधिक काळ भारत विरुद्ध पाकिस्तान युद्ध सुरु राहिले आणि शेवटी या लढाईत भारताने युद्ध जिंकले. दरवर्षी या दिवशी कारगील युद्धात शहीद झालेल्या शेकडो भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण केली जाते. आणि भारतीय सशस्त्र दलाच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी देशभरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजित केले जाते.

कारगिल युद्धाचा इतिहास नेमका कसा आहे ?

1971 च्या भारत-पाक युद्धानंतर (1971 India Pakistan War) दोन्ही देशांमध्ये अनेक सशस्त्र युद्धे झाली आहेत. 1998 मध्ये दोन्ही देशांनी अणुचाचण्या घेतल्या होत्या. लाहोर घोषणेने काश्मीर समस्येवर शांततापूर्ण तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते, ज्यावर दोन्ही देशांनी फेब्रुवारी 1999 मध्ये स्वाक्षरी देखील केली होती. पण पुढे नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानने भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती. याच घुसघोरीला ऑपरेशन बदर असे नाव देण्यात आले होते.

भारतीय सैन्याने विजय कसा घोषित केला ?

26 जुलै 1999 रोजी सैन्याने मिशन यशस्वी झाल्याचे घोषित केले. पण या विजयाची खूप जास्त किंमत भारतीय सैन्याला मोजावी लागली हे मात्र खरं आहे. या युद्धात भारतीय सैन्यातील शूर सैनिकांपैकी एक असलेले कॅप्टन विक्रम बत्रा हे या युद्धात शहीद झाले होते. नंतर बत्रा यांना मरणोत्तर परमवीर चक्र, भारताचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. अलीकडेच विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित शेरशाह नावाचा चित्रपट बनवण्यात आला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mumbai Rain Alert : मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर वाढला, हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी

Mahua Moitra On Amit Shah : "अमित शाह यांचे शीर कापून टेबलावर ठेवायला हवे"; TMC खासदार महुआ मोइत्रा यांचं वादग्रस्त वक्त्तव्य

BCCI India vs Pakistan : "तर मी पाकिस्तानविरुद्ध खेळलो..." पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान सामना व्हावा की नाही? माजी भारतीय खेळाडूच्या मताने वेधल लक्ष

Manoj Jarange Patil : मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, जरांगेंनी ठणकावलं