Satara
Satara  Team Lokshahi
ताज्या बातम्या

Satara : सासनकाठीचा विद्युत तारेला धक्का; शॉक लागून तरुणाचा जागीच मृत्यू

Published by : Sudhir Kakde

सातारा प्रतिनिधी | प्रशांत जगताप : साताऱ्यातील (Satara) कोरेगाव तालुक्यातील भोसे येथे गावाच्या यात्रेत एक अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. ग्रामदेवतेच्या पालखीदरम्यान सासनकाठीला विजेचा धक्का लागल्यानं काठीचा मानकरी असलेल्या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 11 के.व्ही क्षमतेच्या वीज वाहिनीचा शॉक (Electric Shock) लागून काठीचा मानकरी असलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

भोसे गावात मंगळवारी ग्रामदैवत ज्योतिलिंग यात्रेत देवाची पालखी आणि मानाची सासनकाठीची ग्रामप्रदक्षिणा होती. सासनकाठीचे मानकरी महेश बाळासाहेब माने हे होते. त्यांनी ही काठी आकर्षकरित्या सजवून त्यावर वीजेच्या माळादेखील लावल्या होत्या.

सकाळी ग्रामप्रदक्षिणेला सुरुवात झाली त्यावेळी महावितरणच्या ११ के.व्ही. क्षमतेच्या वीजवाहिनीचा काठीला धक्का लागला. वीजप्रवाह काठीत उतरला आणि महेश माने यांचा जागीच मृत्यू झाला. ग्रामस्थांनी त्यांना तातडीनं कोरेगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

माने कुटुंबातील महेश हा एकुलता एक मुलगा होता. सैन्य दलातून निवृत्त झालेल्या त्याच्या वडिलांचेही दोन वर्षापूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. महेश अविवाहीत असून त्यांच्या निधनाने यात्रेचा सगळा उत्साहच मावळला असून या घटनेने संपूर्ण गावाला मोठा धक्का बसला आहे.

पत्नीसोबत अनैसर्गिक सेक्स बलात्कार नाही, तिच्या संमतीचीही आवश्यकता नाही; उच्च न्यायालयाचा निर्णय

टी-२० वर्ल्डकपमध्ये 'इॅम्पॅक्ट प्लेयर'चा नियम नाही, दिग्गज खेळाडू म्हणाला, "कर्णधाराची वेगळी रणनीती..."

साताऱ्यात देवेंद्र फडणवीस कडाडले, म्हणाले, " उदयनराजेंनी जी कामे हातात घेतली..."

"...म्हणून मी तुमच्याकडे मत मागायला आलोय", साताऱ्याच्या सभेत अजित पवारांनी सांगितलं खरं कारण

IPL 2024 : चेन्नई आणि लखनऊ संघाला मोठा धक्का! स्टार खेळाडू आयपीएलमधून बाहेर, प्ले ऑफचं स्वप्न भंगलं?