राजकारण

आमदार बच्चू कडू यांचा अपघात; स्वत:च दिली तब्येतीची माहिती, केले 'हे' आवाहन

Published by : Shweta Shigvan-Kavankar

अमरावती : आमदार बच्चू कडू यांचा अपघात झाला आहे. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याची माहिती मिळत असून एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रस्ता क्रॉस करतांना ही घटना घडली असल्याचे समजत आहे. यानंतर बच्चू कडू यांनी स्वतः ट्विट करत प्रकृतीची माहिती दिली आहे.

बच्चू कडू यांनी ट्विटरवरून आपल्या प्रकृतीची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, आज सकाळी रस्ता क्रॉस करताना माझा अपघात झाला. माझी प्रकृती ठीक असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला विश्रांतीची गरज आहे. कृपया सर्व हितचिंतकांना विनंती की कोणीही भेटायला येऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

दरम्यान, अमरावती शहरात सकाळी 6 ते साडेसहाच्या दरम्यान रस्ता ओलांडताना एका दुचाकीस्वाराने बच्चू कडू यांना धडक दिली आहे. या अपघातात बच्चू कडू रोडच्या डिव्हायडरवर आदळल्याने डोक्याला मोठ्या प्रमाणात मार लागल्याची माहिती मिळत आहे. डोक्याला आणि उजव्या पायाला मोठ्या प्रमाणात इजा झाली आहे. त्यांना तात्काळ अमरावतीच्या एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून बच्चू कडू यांच्या डोक्याला चार टाके पडले आहेत.

Sanjay Raut : निवडणूक आयोगावर किती विश्वास ठेवायचा ?

किरण सामंत विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार?

उज्जवल निकम आज राज ठाकरे यांची भेट घेणार

"हे मोदी सरकार नव्हे, हे तर गजनी सरकार"; उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर डागली 'मशाल'

"कुणी भारताला थप्पड मारली, तर त्याचा जबडा तोडण्याची हिंम्मत आजच्या भारताकडे आहे", सोलापूरात योगी आदित्यनाथ कडाडले