राजकारण

राहुल गांधींना 'सर्वोच्च' दिलासा! आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने अंतरिम आदेशात राहुल गांधी यांच्या 'मोदी आडनाव' टिप्पणीवरून मानहानीच्या खटल्याला स्थगिती दिली. या आदेशानंतर काँग्रेस पक्षात आनंदाचे वातावरण आहे. तर, राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. तर, आदित्य ठाकरेंनी हा सत्याचा विजय असल्याचे म्हंटले आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले की, या देशात न्यायव्यवस्था जिवंत आहे. म्हणून आज सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे. हा सत्याचा विजय आहे. या देशात गांधींना विशेष म्हणजे राहुल गांधी यांच्या कुटुंबियांना खूप काही बोलले गेले. ठाकरे आणि आता पवार यांच्या कुटुंबियांना बोलले जाते. पण, कारवाई होत नाही, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर कॉंग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर प्रतिक्रिया दिली आहे. हा लोकशाहीचा विजय आहे. द्वेषावर प्रेमाचा विजय असल्याचे म्हणत सत्यमेव जयते कॉंग्रेसने म्हंटले आहे. तसेच, मी येतोय, प्रश्न सुरु राहतील, असा इशाराच मोदी सरकारला दिला आहे.

Allu Arjun: मोठी बातमी! अभिनेता अल्लू अर्जुनविरोधात गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

Sanjay Raut : 'नियमाप्रमाणे मोदींनी राजकारणातून निवृत्त व्हावं', राऊतांचा खोचक टोला

Chandrashekhar Bawankule: मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशाच; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर बावनकुळेंचा जोरदार हल्लाबोल

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंचा तातडीचा नाशिक दौरा,हेमंत गोडसेंसाठी शिंदे मैदानात

Megablock: मुंबईकरांनो लक्ष द्या! रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक