राजकारण

शिंदे-फडणवीस सरकार स्थापनेनंतर राज्यात प्रथमच ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचा सरपंच

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मंगेश जोशी| जळगाव : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यात शिंदे गटाचा (Shinde Group) पहिला सरपंच होण्याचा मान हा जळगाव जिल्ह्यातील कुसुंबा ग्रामपंचायतला मिळाला. कुसुंबा ग्रामपंचायतीची माजी मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या नेतृत्वात झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत यमुनाबाई हिलाल ठाकरे या सरपंच पदी विराजमान झाल्या आहेत.

महाविकास आघाडीमधून शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक आमदार व मंत्र्यांनी शिवसेनेतून बाहेर पडत वेगळा गट स्थापन केला व भाजप सोबत राज्यात शिंदे गटाने सत्ता स्थापन केली. त्यामुळे शिवसेनेचे अनेक कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे गटाला समर्थन देत शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला. यामुळे मुख्यमंत्रीपदापासून ते अगदी सरपंच पदापर्यंत सर्व राजकीय समीकरण बदल्याचे पाहायला मिळाले. यातच एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री पदी तर देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री पदी वर्णी लागली. मात्र, अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार हा बाकी असला तरी मात्र या सरकारमधील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पदानंतर थेट राज्यात शिंदे गटाच्या पहिल्या महिला सरपंच होण्याचा मान जळगाव जिल्ह्यातील कुसुंबा येथील यमुनाबाई ठाकरे यांना मिळाला आहे.

एकीकडे राज्याचे सत्ता समीकरण बदलले व त्यातच अनेक ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवडणूक पार पडली. दरम्यान ग्रामपंचायतीची निवडणूक ही पक्षाच्या चिन्हावर जरी लढवली जात नसली तरी मात्र पक्षाच्या नेतृत्वात तयार झालेल्या पॅनलच्या माध्यमातून ही निवडणूक लढवली जाते. त्यामुळे जळगावातील शिंदे गटाचे माजी मंत्री आमदार गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात कुसुंबा ग्रामपंचायतमध्ये समर्थक पॅनलच्या माध्यमातून सरपंच पदाच्या निवडणुकीत यमुनाबाई हिलाल ठाकरे यांना 17 पैकी 9 मते मिळून सरपंच पदी विजयी झाले आहे.

यात यमुनाबाई ठाकरे यांना चंद्रकांत भाऊलाल पाटील, श्रावण शेणफडू कोळी, मीनाबाई अशोक पाटील, प्रमोद गंगाधर घुगे, अश्विनी वाल्मीक पाटील, रामदास मारुती कोळी, बेबाबाई यासीन तडवी व संदलाबाई तडवी यांची मते मिळाली आहे. त्यामुळे राज्यात एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या पहिला महिला सरपंच म्हणून यमुनाबाई ठाकरे यांना बहुमान मिळाला असून कुसुंबा ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचा झेंडा फडकला आहे.

दिनविशेष 07 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

ICSE 2024 Results: आयसीएसई बोर्डाचा १०वी, १२वीचा निकाल जाहीर; यंदा मुलींनी मारली बाजी!

Rohit Pawar: रोहित पवारांचा विरोधकांवर हल्लाबोल; सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाले...

Rice Water: चमकदार त्वचेसाठी तांदळाच्या पाण्याचे फायदे जाणून घ्या...

Naseem Khan: नसीम खान यांचा प्रचार समितीचा राजीनामा मागे