राजकारण

लोकांच्या जीवाशी का खेळता? अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना परखड सवाल

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : खारघर येथील महाराष्ट्र भूषण सोहळ्यात उष्माघाताने तब्बल 13 जणांचा मृत्यू झाला आहे. यावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीले आहे. महाराष्ट्र भूषण कार्यक्रमासांठी 13 कोटी खर्च करण्यात येतात. तर एवढा पैसा खर्च केला होता तर मंडप घालायला कुणी थांबवले होते. माणसांच्या जीवाशी का खेळता, असा परखड सवाल अजित पवारांनी सरकारला विचारला आहे.

खारघर येथे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी लाखो संख्येनं नागरिक उपस्थित होते. यावेळी अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला. त्यात निष्पाप १३ अनुयायांचा नाहक बळी गेला. ही दुर्दैवी घटना निसर्ग निर्मित नसून मानव निर्मित आपत्ती आहे. या दुर्दैवी घटनेला सरकारच सर्वस्वी जबाबदार आहे. या घटनेसाठी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा. तसंच या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २० लाख, तर उष्माघातामुळे बाधित झालेल्या नागरिकांना मोफत उपचारासह प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याची मागणी अजित पवारांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

सरकारने संवेदनशीलता दाखवायला पाहिजे होती. ती दाखवली नाही. सरकारने संवेदनशीलता दाखवण्यास कुठेतरी कमी पडले. दुपारी 4 वाजता कार्यक्रम घेता आला असता. या कार्यक्रमाला आदल्या दिवशी लोक आले होते. यामुळे सकाळी 9 ते 11 कार्यक्रम घेता आला असता. आम्हाला कोणतेही राजकारण करायचे नाही. परंतु, महाराष्ट्र भूषण कार्यक्रमासांठी 13 कोटी खर्च करण्यात येतात. तर एवढा पैसा खर्च केला होता तर मंडप घालायला कुणी थांबवले होते. माणसांच्या जीवाशी का खेळता, असा परखड सवाल अजित पवारांनी सरकारला विचारला आहे.

दरम्यान, खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते ज्येष्ठ निरुपणकार आणि पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्यासाठी लाखो श्री सदस्य सहभागी झाले होते. मात्र, उष्माघात झाल्याने तब्बल 13 जणांचा मृत्यू झाले आहे. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

"भाजप सरकारच्या नादानपणामुळे भारतीय सैनिकांवर हल्ला झाला"; 'मशाल' पेटवून उद्धव ठाकरेंचं PM मोदींवर शरसंधान

IPL 2024 : धरमशाला मैदानात चेन्नई बनला सुपर 'किंग'! पंजाबचा केला दारुण पराभव

"तुतारीची आता पिपाणी करायची आहे"; फलटणच्या सभेत उपमुख्यमंत्री फडणवीसांचा शरद पवारांवर हल्लाबोल

अलिबागच्या सभेत उद्धव ठाकरेंचा PM मोदींवर निशाणा, म्हणाले; "एकनाथ खडसेंचा मला फोन आला आणि..."

"छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला पण आज परिस्थिती बदलली"; शरद पवारांचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा