राजकारण

'कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना शहा, पंतप्रधान मोदींपासून शिंदे-फडणवीस सरकारचे पाठबळ'

Published by : Shweta Shigvan-Kavankar

सोलापूर : महराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच कर्नाटकचे मुख्यमंत्री सातत्याने महाराष्ट्राला डिवचत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र खासदारांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेत हा मुद्दा सोडविण्याची मागणी केली आहे. यानंतरही कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याने काही फरक पडणार नाही, असे म्हंटले आहे. यावरुन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

अमोल मिटकरी म्हणाले की, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला गांभीर्याने घेतलेलं नाही. महाराष्ट्रातील सध्याचे सरकार शेपूट घालून बसलेलं आहे हे त्यांना माहिती आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सीमा वादावर एक शब्द बोलायला तयार नाहीत. त्यामुळे बोम्मई यांची हिंमत वाढली आहे. हिम्मत अशीच वाढलेली नाही, त्यांना अमित शहा नरेंद्र मोदींपासून देवेंद्र फडणवीस आणि शिंदे सरकारपर्यंत सर्वांचे पाठबळ आहे.

महाराष्ट्राचे खासदार भेटल्यानंतरही काही आउटपुट निघालं दिसतं नाही, पण त्यांनी त्यांचे प्रयत्न केले. कर्नाटकचे खासदार भेटल्यानंतर अमित शाह म्हणतील कि, त्यांची बाजू भक्कम आहे. त्यात आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही. हे सर्व नियोजनबद्ध आहे, सगळं काही ठरलेलं आहे. आगामी काळात कर्नाटकच्या निवडणुका पाहता मोदी आणि शहा यांनी ठरवलेले हे सगळं षडयंत्र आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

हिंदुत्वाच्या नावाने या लोकांनी सरकार स्थापन केले आहे. मात्र, मुख्यमंत्री बोलतच नाहीत. पंतप्रधान नागपूरला येत असतील तर त्यांनी हे प्रश्न मांडावेत. मला वाटत नाही की एकनाथ शिंदे काही बोलू शकतील. महाराष्ट्र यापूर्वी इतका षंढ नव्हता जो आज झालेला आहे. 40 आमदार असताना अशी परिस्थिती का, असा निशाणाही मिटकरींनी साधला आहे.

आमदार आशिष जयस्वाल म्हणाले होते की अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचे विस्तार होणार. मात्र, अधिवेशन दोन दिवसावर आहे अजून असे काही झाले नाही. देवेंद्र फडणवीसवांना हे चांगले माहिती आहे की मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर सरकार कोसळेल, असेही त्यांनी म्हंटले आहे.

IPL 2024 : मुंबई इंडियन्सविरोधात मॅकगर्क-स्टब्सचा झंझावात! शेवटच्या चेंडूवर दिल्लीनं जिंकला रंगतदार सामना

भाजपने मुंबई उत्तर-मध्य लोकसभेची उमेदवारी जाहीर केल्यानंतर उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "राजकारणातून..."

कोल्हापूरच्या राजकीय आखाड्यातून PM मोदींचा 'मातोश्री'वर निशाणा; म्हणाले, आज बाळासाहेब असते, तर..."

उद्गीरमध्ये प्रियांका गांधींचा PM मोदींवर हल्लाबोल, म्हणाल्या; "पैशांच्या जोरावर महाराष्ट्रातील आमदारांना..."

Onion Export: कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; केंद्राकडून कांदा निर्यातीला अखेर परवानगी