Governer
Governer  Team Lokshahi
राजकारण

शिवाजी महाराज जुन्या काळातील आदर्श तर नितीन गडकरी सध्याचे आदर्श; राज्यपालांचे पुन्हा वादग्रस्त विधान

Published by : Sagar Pradhan

राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे नेहमी आपल्या वादग्रस्त विधानाने चर्चेत असतात. राज्यपाल आज पुन्हा एकदा त्यांच्या एका विधानामुळे चर्चेत आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवीदान समारंभात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी उपस्थिती लावली. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी डीलिट पदवी देऊन गौरवण्यात आले. तेव्हाच भाषण करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नितीन गडकरी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी केली. त्यामुळे मोठा वाद उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

काय म्हणाले कोश्यारी?

आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो. तेव्हा आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे तुमचा आवडता नेता कोण आहे? तेव्हा ज्यांना सुभाषचंद्र बोस आवडायचे, ज्यांना गांधीजी आवडायचे आणि नेहरू आवडायचे ते त्यांची नावे घ्यायची. मला आता असं वाटतं तुम्हाला कोणी विचारलं तुमचा आयकॉन कोण? तुमचा आवडता नेता कोण? तर तुम्हाला बाहेर जायची गरज नाही.

महाराष्ट्रातच तुम्हाला भेटून जातील. शिवाजी महाराज तर जुन्या काळातील आहेत. मी आधुनिक काळाबाबत बोलत आहे. इथेच मिळतील. डॉ. आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला सर्व इथेच मिळून जातील, असंही वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पुण्यात सभा; मुरलीधर मोहोळ म्हणाले...

संजय राऊतांची PM नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका, पत्रकार परिषदेत म्हणाले; "मोदींचा खोटं बोलण्याचा जागतिक विक्रम..."

Anil Desai: अर्ज भरण्यापूर्वी अनिल देसाईंची प्रतिक्रिया, म्हणाले...

Devendra Fadnavis : माझा उद्धवजींना सवाल आहे, तुम्ही केलेलं एक विकासाचं काम दाखवा

Rohit Pawar : देवेंद्र फडणवीस साहेब खोटं बोलण्याची स्पर्धा लावली तर त्यात तुम्हाला नक्कीच सुवर्णपदक मिळेल