राजकारण

ठाकरे सरकारच्या दिरंगाईमुळे वेदांता प्रकल्प राज्याबाहेर? सावंत संतापले; म्हणाले, लाज वाटली पाहिजे...

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : तत्कालीन ठाकरे सरकारने दिरंगाई केल्यानेच वेदांता प्रकल्प बाहेर गेल्याचा खुलासा एमआयडीसीने माहिती अधिकारात केला आहे. यावरुन आता विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपली आहे. अशात शिवसेना (ठाकरे गट) नेते अरविंद सावंत यांनी शिंदे-फडणवीसांवर टीका केली आहे.

अरविंद सावंत म्हणाले की, आपल्याकडे कसाच कारभार चालतो याचे उत्तम उदाहरण आपल्यासमोर आहे. संतोष गावडे नावाच्या मुलाने 31 ऑक्टोबर रोजी आरटीआयकडे माहिती मागवली होती. आणि त्याच दिवशी त्याला उत्तर आलं. म्हणजे ड्राफ्ट रेडी होता फक्त कोणाचातरी पत्र याव याची वाट बघत होते, असा टोला त्यांनी लगावला आहे.

आदित्य यांनी पत्रकार परिषद घेऊन जर हिम्मत असेल तर समोरासमोर या आणि उत्तर द्या, असे आव्हान दिले आहे. मग, माझा प्रश्न आहे की जर प्रकल्प जात होता. तर, मग आताच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री बैठका का घेतल्या, असा सवालही त्यांनी विचारला आहे.

जी माहिती आरटीआयला मिळाली. ती उद्योग मंत्र्यांना का नाही मिळाली. उद्योग मंत्री म्हणतात, माहिती घेऊन सांगतो आणि आरटीआयला 24 तासात माहिती कशी मिळते. बोलायला लाज वाटली पाहिजे, अशा शब्दात अरविंद सावंत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. आरटीआयचा कागद बघा. आरटीआयच्या कार्यकर्त्यांना माझे आवाहन आहे की इथून पुढे तुम्ही मागितलेली माहिती 24 तासात आली पाहिजे, असेही त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, आगमी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या व शिवसेनेच्या महत्वपूर्ण बैठका सुरु आहेत. दिवाळीला शिधा मिळणार होता. परंतु, अजून देखील तो शिधा काही लोकांना मिळाला नाही. स्थानिक पातळीवर काय होतंय याविषयी या बैठकांमध्ये माहिती घेतली जातेय. 40 जे गेले त्यांच्याविरुद्ध काय करायचे आम्हाला गरज नाही. 288 मतदार संघ महाराष्ट्रात आहेत, महाराष्ट्रातील जनता वाट पाहते की केव्हा एकदा निवडणूक लागते आणि या 40 लोकांना घराची वाट दाखवतोय, असे त्यांनी म्हंटले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार चाचणी वगैरे काही नाही, निवडणुका जाहीर झाल्या नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

CNG : पंपांवर सीएनजीचा तुटवडा; गेल्या 3 दिवसांपासून गॅस उपलब्ध नाही

Health Tips: बदलत्या ऋतुमध्ये अशा प्रकारे घ्या स्वतःची काळजी

Sanjay Shirsat: श्रीमंत लोकांच्या माजलेल्या मुलांवर...; काय म्हणाले संजय शिरसाट?

Vijay Wadettiwar: पुण्यातील हिट अँड रन केस घटनेची न्यायिक चौकशी व्हावी; विजय वड्डेटीवार यांची मागणी

Dadar : दादरमधील इगो मीडिया कपनीचे होर्डिंग हटवले; होर्डिंग हटवले मात्र सांगडा कायम