राजकारण

40 वाघांचे स्थलांतरण केलंय, उर्वरित वाघांचा योग्य उपचार केला जाईल : मुनगंटीवार

Published by : Shweta Shigvan-Kavankar

कल्पना नळसकर | नागपूर : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा आज दुसरा दिवस आहे. अशातच, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मोठे विधान केले आहे. शिवसेनेचे बाकी आमदारही शिंदे गटात येणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तर, ठाकरे गटाचे नेते उध्दव ठाकरे यांच्यावरही कडाडून टीका केली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दावणीला पक्ष बांधलेल्यांचा पक्ष होईल का, असा सवाल त्यांनी उध्दव ठाकरेंना विचारला आहे.

बहुमत वडिलोपार्जित संपत्ती नाही. आमच्या पित्याने पक्ष काढला म्हणजे आमचा अधिकार आहे. उर्वरित दोन भावांचा अधिकार नाही का? इतर ठाकरे कुटुंबीय शिंदे गटात आहेत. बाळासाहेबांचा वारसा चालवणारे दोन तृतीयांश ठाकरे शिंदे गटात आहेत. शिवसेना असं नाव तुम्ही ठेवला आहे, छत्रपतींचे नाव तुम्ही वापरले आहे. मग तर त्यांचे वंशज अध्यक्ष राहिले पाहिजे होते ना, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हंटले आहे.

उद्धव ठाकरेंनी असा गैरसमज का करून घेता की तुमच्या नावानेच लोक निवडून येतात. मग फक्त 56 मतदारसंघात तुमचे नाव चालते का इतर ठिकाणी तुमचं नाव चालत नाही का? जो कसेल त्याची जमीन, तसेच जो काम करेल त्याचा पक्ष. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दावणीला पक्ष बांधलेल्यांचा पक्ष होईल का? असा खोचक प्रश्नही त्यांनी विचारला आहे.

वाघाचे योग्य ठिकाणी स्थनांतरण करण्याचा काम आम्ही सुरू केला आहे. मग तो वाघ जंगलातला असो किंवा राजकारणातला असो. चाळीस वाघांचे स्थलांतरण तर आम्ही योग्य ठिकाणी केले आहे. उर्वरित जखमी वाघांसाठी आम्ही काही रेस्क्यू सेंटर उभारत आहोत. तिथे त्यांचा योग्य उपचार केला जाईल, असे म्हणत ठाकरे गटाचे उर्वरीत आमदारही शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे मुनगंटीवार यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, संजय राऊत यांच्या धमकीचे प्रकरण गंभीर आहे की नाही, हे पोलिसांनी तपासले पाहिजे. प्रकरणांमध्ये सत्यता आहे की नाही याचा तपास झाला पाहिजे अन्यथा एक नवीन फॅशन सुरू होईल, आपण आरोप करायचा आणि मात्र आरोपासंदर्भात माहितीचा स्त्रोत सांगायचाच नाही. संजय राऊतांकडे जी माहिती असेल ती पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन किंवा त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावून घेतले पाहिजे, असेही त्यांनी म्हंटले आहे.

"भाजप सरकारच्या नादानपणामुळे भारतीय सैनिकांवर हल्ला झाला"; 'मशाल' पेटवून उद्धव ठाकरेंचं PM मोदींवर शरसंधान

IPL 2024 : धरमशाला मैदानात चेन्नई बनला सुपर 'किंग'! पंजाबचा केला दारुण पराभव

"तुतारीची आता पिपाणी करायची आहे"; फलटणच्या सभेत उपमुख्यमंत्री फडणवीसांचा शरद पवारांवर हल्लाबोल

अलिबागच्या सभेत उद्धव ठाकरेंचा PM मोदींवर निशाणा, म्हणाले; "एकनाथ खडसेंचा मला फोन आला आणि..."

"छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला पण आज परिस्थिती बदलली"; शरद पवारांचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा