राजकारण

पुढील पंधरा वर्षे शिंदे-फडणवीसांचे सरकार राहणार; चंद्रकांत पाटलांचा दावा

Published by : Shweta Shigvan-Kavankar

सतेज औंधकर | कोल्हापूर : पुढील पंधरा वर्षे शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार राहणार असल्याचा विश्वास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. ते कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

भूविकास बँकेचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना ९६४ कोटी रुपयांची कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यावर शरद पवारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत लबाडाच्या घरचे आवतण, अशी टीका केली होती. यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, हे सरकार लोकाभिमुख सरकार असून अनेक निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या खात्यावरती 50 हजारांचे प्रोत्साहन पर अनुदान देण्याचा निर्णय तसंच सण उत्सव निर्बंध मुक्त करण्याचा निर्णय या सरकारने घेतला आहे. 63 हजार शेतकऱ्यांना या अनुदानाचा फायदा झाला आहे, असे प्रत्युत्तर त्यांनी शरद पवारांना दिले आहे.

तर, औरंगाबाद दौऱ्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर शेतकरी हसले व उद्धव ठाकरे मोठ्या प्रमाणात ट्रोल झाले आहेत. शेतकऱ्यांना पन्नास हजार का लाख रुपये द्यायला पाहिजे होते तुमच्या काळात असा का निर्णय घेतला नाही, असे चंद्रकांत पाटील म्हंटले आहे.

दिपोत्सवानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र दिसले होते. यावरुन राज्यात मनसे, भाजप-शिंदे गट महायुतीत दिसणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे. अशातच मनसे आमदार राजू पादील यांनीही आमची मनं जुळली आहेत. वरून तारा जुळल्या की सगळे जुळून येईल, अशी सूचक प्रतिक्रिया दिली होती. यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले होते. परंतु, चंद्रकांत पाटील यांनी आज या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिंदे व फडणवीस सरकार एकत्र येण्याचा कोणताही प्रस्ताव अद्याप आलेला नाही. त्यावरती कोणतीही चर्चा झालेली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तर, पुढील पंधरा वर्षे शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार राहील, असेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, राज्यात राजकीय घडामोडी सुरु असून सत्तांतरानंतर भाजप, शिंदे आणि मनसेची युती होईल, अशा चर्चा सुरु आहेत. परंतु, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरे एनडीएमध्ये येणार नाहीत. आम्हाला तशी मनसेची आवश्यकता नाही आहे. त्यामुळे राज ठाकरेंची आमच्या महायुतीमध्ये आवश्यकता नाही, असे विधान केले होते.

Abhijeet Patil: अभिजित पाटील यांनी कारखाना वाचवण्यासाठी भाजपला दिला पाठिंबा

"हेमंत गोडसे आणि भारती पवार प्रचंड मताधिक्क्याने निवडून येतील", नाशिकमध्ये मुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केला विश्वास

Sharad Pawar: मतदानाच्या टक्केवारीबाबत शरद पवारांकडून चिंता व्यक्त

...म्हणून १९९९ ला शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काढला, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

Nilesh Rane On Vinayak Raut: माजी खासदार निलेश राणेंची विनायक राऊतांवर टीका