राजकारण

Deepak Kesarkar : दीपक केसरकर म्हणाले, राष्ट्रवादी सोबत आल्याने शिंदे गटाला डावललं...

Published by : Siddhi Naringrekar

Deepak Kesarkar : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे राज्यामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. यावर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केसरकर आज शिर्डीमध्ये असताना माध्यमांशी बोलत होते. केसरकर म्हणाले की, दादा आज ना उद्या आमच्यासोबत येणार याची आम्हाला खात्री होती. जी टीका झाली ती शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात झाली. शिंदे-फडणवीस यांच्या कामाची गती दादा आल्याने आणखी वाढेल.

तसेच अजून 18 मंत्री व्हायचे आहेत. त्यामुळे आमच्या लोकांवर अन्याय होईल असे म्हणण्याचे कारण नाही. लवकरच त्यांचाही शपथविधी होईल. राष्ट्रवादी सोबत आल्याने शिंदे गटाला डावललं जाणार नाही. आमचे जे लोक मंत्री होणार आहेत त्यांना शपथ दिली जाईल. असे केसरकर म्हणाले.

घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत, दोषींवर कारवाई करण्यासाठी CM शिंदेंनी दिल्या सूचना

T20 वर्ल्डकपनंतर रोहित शर्मा घेणार निवृत्ती? हार्दिक पंड्याच्या निवडीबाबत मोठी अपडेट आली समोर

दिनविशेष 14 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

मुंबई, ठाणे, रायगडला अवकाळी पावसानं झोडपलं! वादळी वाऱ्यामुळं घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळलं, ४ जणांचा मृत्यू

"राहुल गांधी तुम्ही पाकिस्तानला घाबरा पण आम्ही भाजपवाले आहोत", पालघरमध्ये अमित शहांचा इंडिया आघाडीवर घणाघात