राजकारण

Devendra Fadnavis : जनतेला त्रास होईल असं आंदोलन कोणी करु नये

Published by : Siddhi Naringrekar

सरकारने विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला 10 टक्के शिक्षणात आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र मनोज जरांगे पाटील आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत.

आजपासून मराठा समाजाचं रास्तारोको आंदोलन सुरु होणार आहे. सकाळी 10.30 ते दुपारी 1 वाजता गावागावांत रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे. राज्याच्या विविध भागात मराठा संघटनाकडून आंदोलन करण्यात येणार आहे. पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी आजपासून आंदोलनाची हाक दिली आहे.

पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी अगोदरच स्पष्ट केलं होत की मराठा समाजाला देताना कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू देणारं नाही. ओबीसी समाजाच आरक्षण पूर्ण अबाधित ठेवून मराठा समाजाला आरक्षण दिलाय त्यामुळे संपुर्ण ओबीसी समाजही आनंदी आहे. ओबीसी आणि मराठा समाज दोन्ही समाधानी आहे. जनतेला त्रास होईल असं आंदोलन कोणी करु नये. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत, दोषींवर कारवाई करण्यासाठी CM शिंदेंनी दिल्या सूचना

T20 वर्ल्डकपनंतर रोहित शर्मा घेणार निवृत्ती? हार्दिक पंड्याच्या निवडीबाबत मोठी अपडेट आली समोर

दिनविशेष 14 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

मुंबई, ठाणे, रायगडला अवकाळी पावसानं झोडपलं! वादळी वाऱ्यामुळं घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळलं, ४ जणांचा मृत्यू

"राहुल गांधी तुम्ही पाकिस्तानला घाबरा पण आम्ही भाजपवाले आहोत", पालघरमध्ये अमित शहांचा इंडिया आघाडीवर घणाघात